भाईंदर :मीरा भाईंदर शहरातील खेळामधील अग्रगण्य संस्था स्पोर्ट्स इंडिया कराटे अकॅडमि आणि आश्रय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. हॉकी चे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवस २९ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो.
यावेळी प्रमुख पाहुणे म्ह्णून आश्रय सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री. दीपक मोरेश्वर नाईक उपस्थित होते. याच बरोबर स्पोर्ट्स इंडिया कराटे चे मास्टर सुभाष मोहिते, मास्टर विनोद कदम ,माजी सैनिक नामदेव कदम, तानाजी पवार , सोशल राईट्स चे मीरा भाईंदर क्रीडा समितीचे अध्यक्ष नंदू जाधव, पोलीस बातमी चे व्हिडिओ एडिटर सागर परब, पालघर बातमीचे संपादक गुरुप्रसाद नाईक,सोशल राईट्सचे उपसचिव विनोद मेढे,पोलीस बातमीचे पत्रकार प्रवीण सुर्वे यांची उपस्थिति होती.
यावेळी राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय तांगसुडो(कोरियन कराटे), लाठी काठी या स्पर्धांचा बक्षीस समारंभ देखील करण्यात आला. शुविधा कदम(३rd Dan ब्लॅकबेल्ट) (२ रौप्य २ कांस्य ) , समर्थ तांबे ( २ रौप्य २ कांस्य ) कस्तुरी सावंतभोसले ( रौप्य) प्रियाजाधव ( रौप्य) सचिन चव्हाण ( २सुवर्ण) शुभम हाम्बरे ( रौप्य) भीम राजभर ( कास्य) अर्जुन राजभर ( कास्य) सान्वी पुजारी ( रौप्य) यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमा चे सूत्रसंचालन गौरव सावंतभोसले( ३rd Dan ब्लॅकबेल्ट) करण पवार ( २nd Dan ब्लॅकबेल्ट) यांनी केले. तसेच शिवदिन यादव (२nd Dan ब्लॅकबेल्ट) दिनेश थापा ( ब्राऊन 2 बेल्ट) सौरभ, आशिष पुजारी यांनी कराटे तसेच लाठी काठी ची प्रात्यक्षिक देखील पाहुण्यां समोर सादर केली.
या सोबत करण तामोळी( ब्लॅक बेल्ट) सानवी पुजारी ( ब्लूबेल्ट)कश्वि जोशी ( ग्रीन2 बेल्ट)अथर्व पवार ( ऑरेंज बेल्ट) मैथिली भोसले( येल्लो बेल्ट) प्रदान करण्यात आला.
