दि.१५/०८/२०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पालघर अंतर्गत बोईसर युनीट पथकास मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार एक इसम मुंबई अहमदाबाद महामार्गावरुन नालासोपारा येथे गांजा विक्री करीता घेवून जाणार आहे. अशी गुप्त माहीती मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र नाईक, प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक संतोष गर्जुर, पोलीस उप निरीक्षक अभिजीत टेलर व पोलीस पथक यांनी सापळा रचुन आरोपी सुनिल सुभाष पवार वय ३२ वर्षे रा.वसई फाटा यास मोटार सायकल वरुन गांजा वाहुतक करीत असताना रंगेहात पकडून त्याचे ताब्यातून ५०,०००/- रुपये किंमतीचा ५ किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ व मोटार सायकल असे जप्त करुन आरोपी विरुध्द ५ किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ व मोटार सायकल असे जप्त करुन आरोपी विरुध्द वालीव पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र. ाा ६९१/२०२० एन.डी.पी.एस.अॅक्ट. १९८५ चे कलम ८(क), २२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपीचे पोलीस कोठडी रिमांड घेवून आरोपी सोबत गांजा हा अंमली पदार्थ विक्री करणारे आरोपी सुरेश अशोक काळे वय २६ वर्षे रा.चिंचोटी व आरोपी सुभान हैदर शेख वय ३२ वर्षे रा. अलकापुरी नालासोपारा यांना अटक करण्याति आली असून त्याची दिनांक २४/०८/२०२० रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजुर आहे. गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक अभिजीत टेलर नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर हे करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री.रविंद्र नाईक, प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर व वसई युनीटचे पोलीस पथकाने सायबर सेलचे पोउनि/सिध्देश शिंदे यांचे मदतीने केली आहे.
