दिनांक २३/०८/२०२० रोजी १६.०० वाजताचे सुमारास डहाणु पोलीस ठाणे हद्दीतील मसोली प्रभुपाडा ता.डहाणु जि. पालघर येथे काही इसम जुगार खेळत असल्याची गुप्त माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.रविंद्र नाईक यांना मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी छापा टाकला असता आरोपी १) रमेश लक्ष्मण माच्छी वय ४५ वर्षे, २) हरीश्चंद्र चैत्या माच्छी वय ५८ वर्षे, ३) शकील गुलाअली पठाण वय ४२ वर्षे, ४) उस्मान शफी शेख वय ४८ वर्षे, ५) रज्जाक गुलाब खाटीक वय ४६ वर्षे, ६) महेश बाबल माच्छी वय ३१ वर्षे, ७) योगेश रमण दुबळा वय ३५ वर्षे, ८) संतोष अशोक तोटा वय ४३ वर्षे, ९) प्रदीप रामु माच्छी वय ४१ वर्षे, १०) आशीष नानकु दुबळा वय ४० वर्षे, ११) रमेश सखाराम कोकणे वय ५८ वर्षे, १२) गणेश मांगता माच्छी वय ५२ वर्षे हे आरोपी क्रमांक १२ यांचे राहते घराचे पहिल्या माळ्यावरील रूम मध्ये तीन पत्ते नावाचा जुगार खेळत व खेळवीत असतांना मिळुन आल्याने त्याच्याकडुन जुगाराची साधने व रोख रक्कम असे ७८,१८०/- रुपये व १,२०,०००/- रुपये किंमतीच्या ४ मोटार सायकल असा एकुण- १,९८,१८०/- किंमतीच्या मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी यांचे विरुध्द डहाणू पोलीस ठाणे गु.रजि.नं.१५६/२०२० भादविसक २६९, १८८ सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम चे कलम ५१ (ब) तसेच साथीचे रोग कायदा कलम ३ सह महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४ व ५ प्रमाणे, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री.रविंद्र नाईक, प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.
