भाईंदर: अशोक शॉपींग सेंटर,भाईंदर पुर्व येथील सोन्याच्या दुकानातून चोरी करुन पळून जाणा-या आरोपीस अटक करुन ५,०६,८५०/- रु. किंमतीचे सोन्याचे दागिने नवघर पोलिसांनी केले हस्तगत. अधिक माहिती अशी कि जंटु चित्तरंजन घोष, वय ४० वर्षे यांचे अशोक शॉपींग सेंटर, भाईंदर पुर्व येथे सोन्याचे दागिन्यांचे डिझाईन करण्याचा गाळा असून दिनांक १५/०४/२०२२ रोजी त्याच्या दुकानात काम करणारा कारागीर प्रबीर सामंता हा ०५,१०,०००/- रु. किं. चे १७० ग्रॅम वजनाचे सोने रिंग चोरी करुन पळुन गेला त्याबाबत त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील आरोपीताचा लवकरात लवकर शोध घेवून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी वघर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेश दिले होते याचे गांभिर्य लक्षात घेवुन गुन्हयाचा तपास पोलीस पथकाने सुरु केला. गुन्हयाचे तपासात तक्रारदार यांना आरोपी बाबत यॊग्य ती माहिती न मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण तपास पथकाने आरोपीची माहिती काढुन त्याचा सी.सी.टिव्ही कॅमेरे व तांत्रीक माहितीचे आधारे तपास सुरु करून आरोपी प्रबीर जयदेव सामंता, वय ४२ वर्षे, राहणार हावडा, राज्य-पश्चिम बंगाल हा त्याच्या मुळ गावी पश्चिम बंगाल येथे पळुन जाण्याच्या तयारीत असतांना त्यास ग्रँड रोड, मुंबई येथुन ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे. आरोपीकडुन पोलीस कस्टडी दरम्यान ५,०६,८५०/- रु. किंमतीचे १६८.९५ ग्रॅम वजनाचे सोने हस्तगत करुन नवघर पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
सदरची कामगिरी श्री. अमीत काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१, डॉ. श्री. शशीकांत भोसले, सहा.पो.आयुक्त, नवघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मिलिंद देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पोनि/प्रकाश मासाळ (गुन्हे), सपोनि/योगेश काळे, पोउनि/अभिजीत लांडे, पोहवा/भुषण पाटील, पोना/गणेश जावळे, पोशि/सुरज घुनावत, पोशि/ओंमकार यादव व पोशि/विनोद जाधव यांनी केलेली आहे.
