मालाड : मुंबईत चोरी करून पश्चिम बंगाल येथे पळून गेलेली आंतरराज्य टोळी गुन्हे शाखा कक्ष ६ पथकाच्या ताब्यात. मिळालेल्या माहिती नुसार श्री. मदन सुनिल बाग, वय ३२ वर्षे यांच्या सोन्याच्या दुकानात ऑक्टोबर २०२१ मध्ये दोन इसम कारागीर म्हणून नोकरीस लागले होते .साधारणपणे २० दिवसानंतर त्या दोन्ही इसम कारागीरांनी त्यांना दागिने बनाविण्यासाठी दिलेले १२,२५,५००/-रू. किमतीचे शुध्द सोने घेवून ते पळून गेले मदन बाग यांनी सर्वठिकाणी शोध घेतल्यानंतर त्यांचा ठावठिकाणा न लागल्याने त्यांनी दिंडोशी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला होता. या गुन्हयातील आरोपी यांनी अतिशय चलाखीने नियोजन करून खोटे नाव, बनावट आधारकार्ड देवून फिर्यादींची फसवणुक केली होती.
गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष ६ यांना सदर गुन्हयाची माहिती प्राप्त होताच समांतर तपास करीत होते. आरोपी इसमाचा मोबाईल क्रमांक बंद येत असल्यामुळे तपास करताना प्रथमत: काहीएक माहिती मिळून येत नव्हती. म्हणून आरोपी यांनी अशाप्रकारचे गुन्हे इतरही ठिकाणी केले असल्याच्या शक्यतेवरून मुंबई शहरातील पोलीस ठाण्यातील माहिती घेवून, दिंडोशी, कूर्ला व पायधुनी याठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे झाल्याचे आढळून आले. तिन्ही ठिकाणचे फिर्यादी यांचेकडून अधिक माहिती घेतली असता, सदर तिन्ही ठिकाणी एकाच टोळीने गुन्हा केल्याचे स्पष्ट होत होते.त्यावरून तपासाला दिशा मिळाल्यामुळे त्यांची गोपनीय माहिती काढून सोशल मिडीयाद्वारे अधिक माहिती घेवून मिळालेल्या,माहिती द्वारे आरोपी हे पश्चिम बंगाल येथील कोलाघाट परीसरात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यावरून मा. वरिष्ठांच्या आदेशान्वये पोलीस उप निरीक्षक सुभाष मुठे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक कोलाघाट, पुर्बा मेदनीपुर, पश्चिम बंगाल याठिकाणी गेले. सदर ठिकाणचा परीसर ग्रामीण भाग व जंगल परीसर असल्याने आरोपी हे कोठे लपून बसले याबाबत ठावठिकाणा पोलीस पथकास मिळत नव्हता. साध्या वेषामध्ये पथक हे कधी रिक्षा कधी पायपीट करून आरोपींचा शोध घेत होते. साधारणपणे ४ ते ५ दिवसानंतर आरोपींचा ठावठिकाणा मिळाल्याने सदर ठिकाणी स्थानिक पोलीसांच्या मदतीने छापा टाकला असता आरोपी १)शुभंकर परबीर बसू ,वय २८ वर्ष, राठी:- पुलसीता, वेस्ट बंगाल २)सुवोजित बिजय कुमार बाग वय ३६वर्ष, राठी:-पुलसीता, वेस्ट बंगाल.३)संजय सासनको कांडार वय ३८ वर्ष, राठी:- कोरासिया, वेस्ट बंगाल.हे मिळून आले.
आरोपी यांना मुंबई येथे आणून त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, सदर आरोपींची एक आंतरराज्य टोळी असून, आरोपी यांनी मुंबई शहरातील दिडोंशी पोलीस ठाणे ,कुर्ला पोलीस ठाणे ,आणि पायधुनी पो.ठाणे , याठिकाणी गुन्हे केले असल्याचे तसेच राजस्थान व लखनऊ राज्यात देखील गुन्हे केले असल्याचे चौकशी दरम्यान स्पष्ट झाले आहे. प्रत्येक आरोपी गुन्हा करतेवळी ठरवून दिलेली कामे करीत होते त्यामध्ये एक आरोपी प्रत्यक्ष चोरी करण्यासाठी, दुसरा आरोपी चोरलेले सोने विकण्यासाठी, तिसरा आरोपी ज्या ठिकाणी चोरी करावयाचे आहे ते ठिकाण शोधण्यासाठी आणि चौथा आरोपी बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी अशारितीने नियोजनबध्द काम करीत होते.तपासादरम्यान ०३ आरोपींकडून गुन्हा करताना वापरलेले ५ मोबाईल, ५ सिमकार्ड, ७ बोगस आधारकार्ड, सोने टंच पावत्या, गुन्हे करण्या करीता येण्या-जाण्या करीता वापरलेली रेल्वेची ऑनलाईन तिकीटे तसेच ११३ ग्रॅम वजनाचे आणि ५,३५,000/- किंमतीचे सोने हस्तगत केले असून, आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये असून, गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सुभाष मुठे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा.पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री सुहास वारके सो, मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे),श्री विरेश प्रभु सो, मा.पोलीस उपायुक्त ,श्री संग्रामसिंह निशानदार सो, मा. पोलीस उपायुक्त, श्री. दत्ता नलावडे सो व मा.सपोआ (डी पुर्व), चंद्रकांत जाधव सो यांचे मार्गदर्शनाखाली कक्ष ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र साळंखे, पो.नि. एच.एम.ननावरे, पो.नि. प्रविणकुमार बांगर, स.पो.नि. सचिन गावडे, स.पो.नि. मिरा देशमुख, पोलीस उप निरीक्षक सुभाष मुठे, स.फौ./बेंडाले, स.फौ. /सावंत, स.फौ. /सकपाळ, स.फौ. /आव्हाड, स.फौ./कुरडे, स.फौ.क./ देसाई, पो.ह.क. /सावंत, पो.ह.क. /पारकर, पो.ना. /तुपे, पो.ना. /शिंदे, पो.ना./गायकवाड, पो.ना.क्र. /वानखेडे, पो.ना. /मोरे, पो.ना. /आराख, पो.शि. /घेरडे, पो.शि/भालेराव, पो.शि. /माळवेकर, पो.शि. /कोळेकर,पो.शि. /इंगळे, पो.शि. /चव्हाण, पो.शि. /पवार, पो.शि. शेख म.पो.शि., पो.ना. चा. /कदम, पो.ना.चा. /डाळे, पो.ना.चा.क. ०३१५२४/जायभाये आणि पो.शि.चा.. /पाटील यांचे पथकाने पार पाडली आहे.
