तुळींज : दिवसा ढवळ्या गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने लंपास करणारी टोळीला गुन्हे शाखा कक्ष-२ वसई यांना पकडण्यात यश. अधिक माहिती अशी कि सौ. मिरा अनुष्ठाण, वय ५० वर्षे, रा. नालासोपारा पुर्व, या दिनांक ०२/०४/२०२२ रोजी ११.०० वा. सुमारास बाजारात भाजी आणण्यासाठी रहमत नगर, नालासोपारा पुर्व येथे गेल्या असता आरोपी यांनी त्यांना बोलण्यात गुंतवुन मिरा अनुष्ठाण यांच्या गळयातील मंगळसुत्र व कर्णफुले काढण्यास सांगितले व ते दागिने रुमालात गुंडाळत असल्याचे भासवुन हातचलाखीने त्यांचे सोन्याचे दागिने फसवणुक करुन पळून गेले याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता .
सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने वरीष्ठ पोलीस अधिकारी यांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे तपास व गुप्त बातमीदाराकरवी माहीती प्राप्त करुन नमुद गुन्हयातील आरोपीत यांची नावे निष्पन्न झाल्यावर पोलीस पथकाने आरोपी १) संजय राजु सलाट, वय-२० वर्ष २) भिमाभाई शांतीलाल राठोड वय ४० वर्ष ३) अर्जुन शांतीलाल राठोड, वय-१८ वर्ष वरील सर्व सध्या रा. ओम साई चाळ, कन्हेर, खैरपाडा, ईश्वरनगर, विरार फाटा, यांना ताब्यात घेतले . घेवून नमुद आरोपी याचेकडुन एकूण ८ गुन्ह्यांची उकल करण्यास न्हे शाखा कक्ष-२ वसई यांना यश आले आहे. वरील आरोपी यांना प्रथम तुळींज पोलीस ठाण्यातील गुन्हयात अटक करुन आरोपीयांच्या कडुन मे गुन्हयातील सोने हस्तगत करण्यात आले आहे.सदर गुन्हयाचा तपास सपोनिरी/सागर शिंदे नेम- गुन्हे शाखा कक्ष -२ वसई हे करीत आहेत.
सदरची कारवाई डॉ. श्री. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा-२ वसई युनीटचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सपोनिरी/ सुहास कांबळे, सागर शिंदे, सहाफौज/रमेश भोसले, पोहवा/ संजय नवले, महेश पागधरे, चंदन मोरे, जगदीश गोवारी, पोना/प्रशांतकुमार ठाकुर, पो.अंम/ अमोल कोरे, दादा आडके, सुधीर नरळे यांनी केली आहे.
