ठाणे : दिनांक ०७/१२/२०२१ रोजी मिनल मिलींद चव्हाण वय ४५ वर्षे या दिवा ते ठाणे असा रेल्वे प्रवास महिला डब्यांतून करीत असतांना गर्दीचा फायदा घेवून अज्ञात महिला चोराने त्यांची शोल्डर पर्सची चैन खोलून आतील ३,४७,३५०/रु कि चा ऐवज चोरी केला त्यामध्ये त्यांचे सोन्याचे मंगळसुत्र,सोन्याचा राणी हार ,व रोख रक्कम चोरी केली याबाबत मिनल चव्हाण यांनी ठाणे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून अज्ञात महिला चोरा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाल्या नंतर गुन्हयाचे घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्याची पाहणी पोलिसांनी केली असता, दिवा रेल्वे स्टेशन येथे आलेल्या लोकल गाडीच्या महिलांचे डब्यांत तक्रार दार यांच्या पाठोपाठ एक संशयीत महिला चढतांना स्पष्टपणे दिसली. सीसीटीव्ही फुटेज मध्ये निदर्शनास आलेली महिलेची रेल्वे पोलीस आयुक्तालयाच्या अभिलेखावरील अशाप्रकारचे गुन्हे करणा-या महिला आरोपींची पडताळणी केली असता, ती महिला भक्ती भुषण परब वय ३१ वर्षे रा. ठी. दिवा असल्याची खात्री झाली. आरोपी महिलेने ज्या ज्या मार्गाने प्रवास केला त्या त्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले व बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी महिलेस तिच्या राहत्या घरातून चौकशी करता पोलीस ठाण्यात आणले असता सदर महिलेने आपला गुन्हा कबुल केला असून तिला अटक करण्यात आली आहे तसेच आरोपी कडून चोरलेला ऐवज ३,४३, ४५० / रु कि सोन्याचे मंगळसुत्र व राणी हार असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई श्री. कैसर खलिद, पोलीस उप आयुक्त श्री मनोज पाटील, यांचे सुचना व आदेशानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अशोक होळकर, पोहवा / संदिप गायकवाड, अतूल साळवी, अतूल धायडे, पोना/अमित बडेकर, अनिल खाडे, सतीश धायगुडे, गणेश माने, पोशि/ हरीश संदानशिव, मपोहवा / रिमता वसावे, मपोना/पद्मा केंजळे व सोनाली पाटील यांनी केली आहे. रेल्वे प्रवासांत आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन गुन्हे शाखा, लोहमार्ग मुंबई यांनी केली आहे.
