विरार : गुन्हे शाखा, कक्ष-३ विरार यांनी सोन्याची नाणी सांगून पितळी धातूची नाणे देवून फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक केली .मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २५/०७/२०२२ रोजी संध्याकाळच्या वेळेस सुनिल प्रविणचंद्र चोक्सी यांना एका अनोळखी व्यक्तीने पंचवटी हॉटेल जवळील भाजी मार्केट वसई (पश्चिम) येथे भेटून त्याच्या जवळ ५ किलो सोन्याचे पाने आहेत असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडील १२,००,०००/- रुपये रोख रक्कम त्यांना देण्यास भाग पाडुन चोक्सी यांना सोन्याचे पाने न देता पितळी धातुचे पाने देवुन त्यांची फसवणूक करून पळुन गेला होता. सदरबाबत चोक्सी यांनी अज्ञात आरोपी विरुध्द दिलेल्या तक्रारीवरून वालीव पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात जमीनीत गाडलेले पुरातन सोन्याचे नाणे मिळालेले आहे असे भासवुन ते कमी किंमतीत विक्री करण्याचा बहाणा करुन नागरिकांची फसवणुक करण्या-या गुन्हयांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली होती. सदर गुन्हयांची वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेवुन अश्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी व आरोपीचा शोध घेण्याबाबत पोलीस पथकास सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष ३ विरार मधील कार्यरत अधिकारी व अंमलदारांची वेगवेगळी स्वतंत्र पथके तयार करुन गुन्हयातील आरोपींचा तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने माहिती प्राप्त करुन शोध घेतला व आरोपी १) विशाल धर्मा राय, वय १९ वर्षे, रा. जैन नगर, खेडा फिरोजाबाद, राज्य उत्तर प्रदेश., २) संजु वालीया राय, वय २७ वर्षे, रा. घर नंबर ३५४, सुशीला विहार २ , बुलंद शहर, राज्य उत्तर प्रदेश, ३) शिवराम हिरालाल माली, वय ५७ वर्षे, रा. , जैन नगर, खेडा फिरोजाबाद, राज्य उत्तर प्रदेश, ४) मिना रामलाल सोलंकी, वय ४५ वर्षे, रा. गुप्ता मेडीकल जवळ, जैन नगर, खेडा फिरोजाबाद, राज्य उत्तर प्रदेश यांना अंदाजे ५ किलो वजनाच्या पिवळ्या रंगाचे बनावट सोन्याचे पाने, मनी व मन्यांची माळ अशा मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले असून सदर गुन्हयाचा पुढील तपास वालीव पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कामगिरी श्री. विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), अति.कार्यभार (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.प्रमोद बडाख, पो.उप.निरी. शिवाजी खाडे, उमेश भागवत, पो.हवा. अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, शंकर शिंदे, सचिन घेरे, सागर बारवकर, पो.ना. मनोज सकपाळ, पो.अं.राकेश पवार, अश्विन पाटील, सुमित जाधव सर्व नेम- गुन्हे शाखा, कक्ष ३ विरार यांनी पार पाडली आहे.
