दिनांक : ३०/०९/२०२१ रोजी धर्मेंद्र विनोद गाला, वय ३४, रा.ठि. चिंचबंदर, मुंबई यांनी परेल वरून सीएसएमटी येण्यासाठी लोकल ने प्रवास करीत असतांना लोकल भायखळा रेल्वे स्टेशन वर आली असता एका अनोळखी व्यक्तीने येवून त्यांच्या गळ्यातील ६०,०००/- रु. कि. २० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळीजबरदस्ती खेचून चोरी करून पळून गेला या बाबत गाला यांनी सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्यातील अनोळखी व्यक्तीचा तपास करीत असताना तपासादरम्यान गुन्ह्याचे घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने खास गुप्त बातमीदार यांनी दिलेल्या माहितीवरून आरोपी तारू मोहम्मद अली शेख, वय ३३ वर्षे, रा.ठि. आनंदनगर, (पूर्व), कल्याण यांनेच गुन्हा केल्याचे तपासात उघड झाल्याने त्यास अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपीने दिलेल्या कबुली मध्ये त्याच्या घरातून ६०,०००/- रू. किं. सोन्याची चैन जप्त करण्यात आली .
सदरची कामगिरी सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे चे सपोनि श्री रूपवते, पोहवा.घोडके, पो हवा. देसले, पोहवा. मोहिते, पोना. इंगवले, पोना. टकले,पोशि. पाटील,पो शि. चव्हाण यांनी केलेली आहे.
