वसई : सोनसाखळी चोरणाराऱ्या दोन आरोपींना २४ तासास अटक करुन दोन गुन्हयांची उकल, पेल्हार पोलीस ठाणेची कामगिरी मिळालेल्या माहिती नुसार सौ. दर्शना दत्ताराम खाडे वय – ४४ वर्ष रा. रुम नं – २०३, मंगलमुर्ती बिल्डिंग नं-१५, तुंगार फाटा, वसई पुर्व ता. वसई जि. पालघर या दिनांक ०३/०९/२०२३ रोजी संध्याकाळी ०६. ०० व. च्या दरम्यान मुंबई अहमदाबाद महामार्ग रोड क्र -८, बर्मासेल पेट्रोलपंप जवळ, सर्व्हिस रोड ने चालत घरी जात असताना मोटार सायकल वरुन आलेल्या आरोपींनी त्यांच्या पाठीमागुन येवुन गळयातील ६५,०००/- रु कि चे सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने खेचुन पळुन गेले याबाबत दर्शना खाडे यांनी तक्रार नोंदविली त्यावरून पेल्हार पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तसेच दिनांक २९/०८/२०२३ रोजी वालीव पोलीस ठाण्याचे हद्दीत अशाच प्रकारचा गुन्हा घडलेला असल्याने सदर दोन्ही गुन्हे हे एकाच आरोपी यांनी केल्याचा संशय पोलिसांना असल्याने पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांना सदर चैन चोरी करणा-या आरोपींचा छडा लावुन जेरबंद करण्याचे आदेश पोलिसांस दिले होते .
वर नमुद गुन्हयाच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन गुन्हयाचे घटनास्थळावरील पुराव्याचे बारकाईने परीक्षण करुन सदर गुन्हयाच्या तपास कौशल्यावरुन आरोपी यांनी गुन्हयात वापरलेल्या बुलेटचा क्रमांक प्राप्त करुन सदर बुलेटच्या मालकाच्या मार्फतीने गुन्हयातील मुळ आरोपी यांचा मुलुड, कुर्ला असा माग काढुन आरोपी १) भरत मोहनलाल पुरोहित वय – ३६ वर्ष २) महेश भवरलाल भावत वय-३० वर्ष दोघे रा. शॉप नं-०२,गजानन निवास,हॉलीक्रॉस शाळे समोर,कुमारखंड पाडा डोंबीवली प. जि. ठाणे मुळ – ग्राम – चंदेशरा थाना-दबोक ता.मावली जि.उदयपुर राज्य – राजस्थान यांना डोंबिवली येथुन दिनांक ०६/०९/२०२३ रोजी सदर गुन्हयात ताब्यात घेवुन त्यांच्या कडुन ६०,०००/- रु कि.चे एक सोन्याचे मंगळसुत्र व गुन्हा करण्याकरीता वापरलेली १,००,०००/- रुपये किंमतीची बुलेट असा एकुण १,६०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर दाखल असलेल्या अजून दोन गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सदरची कामगिरी श्री. सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त सो, परिमंडळ – ३, विरार, श्री. रामचंद्र देशमुख, सहायक पोलीस आयुक्त सो, विरार विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. वसंत लब्दे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो, श्री. विजय पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. शिवानंद देवकर, पोलीस निरीक्षक (प्रशासन) पेल्हार पोलीस ठाणे, तपासीक अधिकार पोउपनि . तुकाराम भोपळे, गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोहवा. योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, पोअं. संजय मासाळ, रवि वानखेडे, किरण आव्हाड, राहुल कर्पे, निखिल मंडलिक, अनिल साबळे, दिलदार शेख, सुजय पाटील, सर्व नेम पेल्हार पोलीस ठाणे तसेच पोहवा. नामदेव ढोणे, पोअं. सोहेल शेख, नेम – पोलीस उपायुक्त कार्यालय, परिमंडळ – ३ विरार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
