कशिमीरा दि.(२०): मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१ यांचे हस्ते काशिमीरा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील गहाळ झालेले २४,७०,०००/- रुपये किंमतीचे एकुण १३५ मोबाईल तक्रारदार यांना परत करण्यात आले . अधिकमाहिती अशी कि, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-१, मिरारोड हद्दीतील कशिमीरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सन २०२२ व २०२३ मधील गहाळ मोबाईलचे पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत गांगुर्डे व पो. हवा. सुधीर खोत यांनी आय. एम. ई. आय.नं., कॉल डिटेल्स, टॉवर लोकेशन व इतर तांत्रिक विश्लेषण करुन व त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करून त्या आधारे विविध कंपन्याचे २४,७०,०००/- रु. किंमतीचे एकुण १३५ मोबाईल हस्तगत करुन सदरचे मोबाईल हे श्री. जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ यांचे हस्ते तक्रारदार यांना दिनांक १८-०५-२०२३ रोजी परत करण्यात आले.
काशिमीरा पोलीस ठाणे येथे घेण्यात आलेल्या मोबाईल हस्तांतरण कार्यक्रममादरम्यान तक्रारदार यांना सदरचे मोबाईल कायदेशीर बाबींची पुर्तता करुन परत मिळवून दिल्याने संबंधितांनी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीसांचे आभार मानून आनंद व्यक्त केला आहे.
सदरची कामगिरी श्री. जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, मिरारोड, श्री. विलास सानप, सहायक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली काशिमीरा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. संदिप कदम, पो.नि. श्री. कुमारगौरव धादवड (गुन्हे), पो.नि. श्री. जितेंद्र पाटील (प्रशासन), स.पो.नि. श्री. प्रशांत गांगुर्डे, पो.उप.नि. श्री. निखिल चव्हाण, पो. हवा. सुधीर खोत तसेच पो. हवा. जयप्रकाश जाधव नेम. पो. उ. आ. कार्यालय, परिमंडळ ०१ यांनी केली आहे.
