मिरारोड (दि.१०) : ५०३ ग्रॅम वजनाचा ०१,००,६०,०००/- रु. किंमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्री करीता बाळगणाऱ्या परकीय नायजेरीयन व्यक्तींवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. मिळालेल्या माहितीनुसार मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत मिरारोड, काशिमिरा, भाईंदर परिसरात अंमली पदार्थाची खरेदी विक्री करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांच्याकडे काही आक्षेपार्ह वस्तु मिळुन आल्यास कायदेशीर कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी सुचना व मार्गदर्शन पोलिसांना केले होते.त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी पो.नि. श्री. अमर मराठे व पोलीस कर्मचारी हे दिनांक ०७.०६.२०२३ रोजी जी. सी. सी. क्बल हाटकेश ते बाबा टायर बाजुकडे मिरारोड (पुर्व) येथे गस्त करीत असताना एक परकीय नायजेरीन व्यक्ती हा त्याच्या खांदयावर ब्राउन रंगाची हॅन्डबॅग अडकवलेल्या स्थितीत संशयास्पद आढळुन आला म्हणुन पोलिसांनी कायदेशीर बाबींची पुर्तता करुन त्यास ताब्यात घेत असताना तो पळुन जाण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिसांनी सदर इसमास शिताफीने ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५०३ ग्रॅम वजनाचा ०१,००,६०,०००/-रु. किंमतीचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्री करीता बाळगला असल्याचे निदर्शनास आले. सदर नायजेरियन इसमाविरुध्द काशिमीरा पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक करीत आहे.
सदरची कारवाई श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. विजयकुमार मराठे, सहायक पोलीस आयुक्त (मुख्यालय) तथा अति. कार्यभार सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी पो. नि. अमर मराठे, स. पो. नि. विलास कुटे, पो.हवा. इंगळे, टक्के, पाटील, आव्हाड, सपकाळ, म.पो.हवा. एक्कलदेवी, पो. अंम. यादव यांनी केली आहे.
