सुप्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, करोनामुळे होते अॅडमिट

Uncategorized

इंदूर- प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. राहत इंदौरी यांना करोना व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर अरबिंदो इस्पितळात नेण्यात आलं होतं. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांचं निधन झालं. सध्या संपूर्ण मध्यप्रदेशात दुःखाची लाट पसरली आहे. सर्व राजकारणी आणि कलाकार मंडळी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. आज सकाळी त्यांनी स्वतः करोनाची लागण झाल्याने इस्पितळात भरती झाल्याचे ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले की, ‘करोनाची सौम्य लक्षणं दिसल्यानंतर काल करोनाची चाचणी केली. याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मी ऑरबिंदो इस्पितळात भरती झालो. मी या आजाराला हरवेन अशी प्रार्थना करा.’ यासोबत कोणीही घरच्यांना किंवा त्यांना फोन न करण्याचीही विनंती केली होती. अरबिंदो इस्पितळातील डॉक्टर विनोद भंडारी यांनी सांगितले की, ‘राहत इंदौरी आधीपासून अनेक आजारांनी ग्रस्त होते. त्यांना मधुमेहाचा आणि हृदयाचा आजार होता. दोनदा हृदयविकाराचे झटका आला. यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. डॉक्टर पुढे म्हणाले की, त्यांना ६० टक्के निमोनिया होता. याशिवाय त्यांचं ७० टक्के यकृत खराब होतं, करोना पॉझिटिव्ह होते, हायपर टेन्शन आणि मधुमेहाचाही त्रास होता.’

आजच दिली होती माहिती
राहत इंदौरी हे इंदूरमधील एका खासगी इस्पितळात दाखल झाले होते. कोविड रिपोर्ट आल्यानंतर त्यांना अरबिंदो इस्पितळात भरती करण्या आलं. आज सकाळी ट्वीट करत त्यांनी यासंबंधीची माहितीही दिली होती.

शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं दुःख
राहत इंदौरी यांच्या निधनानंतर संपूर्ण मध्यप्रदेशमध्ये दुःखाचं सावट पसरलं आहे. मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनीही यासंबंधी ट्वीट करत दुःख व्यक्त केलं. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, ‘आपल्या शायरीने कोट्यवधींची मनं जिंकणारे प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांच्या निधनाने फक्त मध्यप्रदेशच नाही तर संपूर्ण देशाचे नुकसान झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. कुटुंबियांना आणि चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो.’

कमलनाथ यांनीही व्यक्त केलं दुःख
माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही राहत इंदौरी यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. सुप्रसिद्ध शायर आणि फक्त मध्यप्रदेशच नाही तर देशाची शान असलेले इंदौरी यांच्या निधनामुळे मी स्तब्ध झालो आहोत. आज सकाळी त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे समजले होते. सर्वांनीच ते बरे व्हावी अशी प्रार्थना केली होती. पण ते असे अचानक सर्वांना सोडून जातील यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये.’
दरम्यान, इंदूर हे करोनाचं हॉटस्पॉट झालं आहे. सुरुवातीला सर्वात जास्त करोनाचे रुग्ण इंदूर येथेच सापडले होते. काही दिवसांनी स्थिती नियंत्रणात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा इंदूर येथे करोना रुग्णांची संख्या वाढली होती. रविवारी इंदूर येथे २०८ करोना रुग्ण सापडले होते. तर सोमवारी ही संख्या १७६ होती.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply