दि. – ०७/०९/२०२१ मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे या ठिकाणी मिनाक्षी महेंद्र गायतोंडे. वय – २५ वर्षे, राह. कांदीवली (पश्चिम) मुंबई. या दिनांक – ०५/०९/२०२१ रोजी चर्चगेट स्लो लोकल ने कांदीवली ते माहीम असा प्रवास करुन माहीम रेल्वे स्टेशन येथे उतरत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे हॅण्डबॅगेतील एकुण – ७९,९००/- रुपये किं. चा एक अॅपल कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने चोरी झाल्याची तक्रार नोंदवली असता त्यावरून वरिल प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.सदर गुन्ह्यातील अज्ञात चोरटा व चोरीस गेले मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी/ अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळावरील सी. सी. टि. व्ही. कॅमेऱ्यांचे रेकॉडींग प्राप्त करुन त्यातील संशयीत आरोपी यास निष्पन्न करुन, आरोपीचे फोटो डेव्हलप केला असता नमुद आरोपी हा लोहमार्ग आयुक्तालयाचे अभिलेखावरील सराईत आरोपी अनिलकुमार हनमंता चलवादी. वय – ३२ वर्षे, राह. माटुंगा, हा असल्याचे निष्पन्न झाले. नमुद आरोपी याचे फोटो गुप्त बातमीदार यांना देवुन त्याचा शोध घेत असताना नमुद आरोपीला दि. ०६/०९/२०२१ रोजी शाहुनगर, माहीम येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली. अटक मुदतीत आरोपी याचेकडे केले तपासात गुन्ह्यातील चोरीस गेला एकुण – ७९,९००/- रुपये किं. चा एक अॅपल कंपनीचा मोबाईल फोन हस्तगत करुन गुन्हा उघडकीस करण्यात आला.
सदर कामगिरी मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. मेहबुब इनामदार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक – श्री. एस. जे. कदम, पो. हवा. डी. जी. गोपाळे., पो. हवा. डब्ल्यु. ए. शेख, पो. हवा. एन. वाय. खाडे., पो. हवा., व्ही. झेड. आखाडे, पो. ना. एस. एस. कांबळे, पो.शि. ए.एन. मराळ, पो.शि. व्ही. बी. गोपाळ, पो. शि. पी. आर. होनमाने यांनी नमुद गुन्ह्याचे तपासात अत्यंत महत्वपुर्ण कामगिरी बजावली आहे.
