दिनांक २७/०७/२०२१ रोजी दुपारी १. ४० च्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशन पूर्व बाजूकडील बुकींग ऑफिस समोर तीन अनोळखी इसमांनी फिर्यादी व त्यांचा मावस भाऊ यांस दमदाटी करून चाकूचा धाक दाखवून त्यांचे जवळील १७,०००/- रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेले अशी तक्रार फिर्यादी याने कल्याण रेल्वे पोलीस ठाणे येथे दिली व त्यानुसार त्या अज्ञात इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
नमूद गुन्ह्याचा सी सी टीव्ही फुटेज वरून यातील संशयीत आरोपीचा समांतर तपास मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा , कल्याण युनिट ३ चे सपोनि शेख व स्टाफ करीत असतानां यातील संशयीत इसम हे हनुमान नगर, विठ्ठलवाडी पूर्व परिसरात येणार असले बाबत गुप्त माहितीदारा कडून माहित दिली. मिळालेल्या माहित प्रमाणे त्याठिकाणी जाऊन साफळा लावला असता हनुमान नगर, बुध्दविहार परिसरात तीन इसम दिसले असता सदरचे तिन्ही इसम हे नमूद गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेज मधील इसम आल्याबाबत बातमीदाराने सांगितल्याने त्या तिन्ही इसमांना ताब्यात घेऊन पुढील चौकशी केली असता आरोपी १) नाव : श्रेयस सतीश कांबळे उर्फ जाड्या वय : १९, रा. विठ्ठलवाडी ठाणे पूर्व २) आकाश नरेश माने वय : १८, रा. कल्याण पूर्व ३) रुपेश लल्लन कनोजिया वय : १८ रा. विठ्ठलवाडी ठाणे पूर्व अशी त्यांची नांवे सांगितली. त्यांचेकडे केलेल्या चौकशीत त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली केला व त्यांच्याकडील चोरीस गेलेले १७,००/- रुपये किंमतीचे मोबाईल फोन तसेच हत्यार ताब्यात घेण्यात आली.
सदरची कामगिरी हि मा. श्री. कैसर खालिद , मा. पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई, श्री. एम.एम. मकानदार, मा. पोलीस उप आयुक्त, मध्य परिमंडळ,लोहमार्ग याचे आदेशाप्रमाणे गुन्हेशाखा , लोहमार्ग मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरीक्षक , ए. सी. शेख यांच्या अधिपत्याखाली पोहवा , दिवटे, पोहवा पुलेकर , पोहवा . भोजने , पोना. कर्डीले , पोना . माने, पोना . तायडे , पोशि. सुरवसे , मपोशी . पाटील यांनी केली आहे.
