देशातील व महाराष्ट्रातील काही भागात घडलेल्या अप्रिय घटनेच्या अनुषंगाने धार्मिक भावना भडकविणाऱ्या काही आक्षेपार्ह पोस्ट, खोटया बातम्या प्रसारित करणारे ऑडिओ, व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रसारित होत आहेत.
सामाजिक शांतता भंग करणारे, समाजविघातक पोस्ट, ऑडिओ, व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रसारित करणे कायदयाने गुन्हा आहे. सोशल मिडीया व इंटरनेटच्या माध्यमातुन पोस्ट करताना सामाजिक भान ठेवत माहिती तंत्रज्ञान कायदा अधिनियम २००० (I.T.Act 2000) मधील तरुतुदींचे काटेकोरपणे पालन करावे. व्हॉट्सऍप वापरणारे सर्व नागरिक विशेषत: ग्रुप ऍडमिन यांनी आपल्या ग्रुप मध्ये अशा प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट, ऑडिओ, व्हिडिओ प्रसारित होणार नाही. याची विशेष दक्षता घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये.
सायबर गुन्हे शाखा, मिरा – भाईंदर, वसई – विरार आयुक्तालयाकडुन सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, धार्मिक भावना भडकवणाऱ्या व जातीय तेढ निर्माण होतील अशा बातम्या सोशल मिडीयावर प्रसारित करणाऱ्या पोस्ट, ऑडिओ, व्हिडिओ करताना कोणीही आढळुन आल्यास त्याची माहिती त्वरीत नजीकच्या पोलीस ठाणे किंवा नियंत्रण कक्षास देण्यात यावी.
मि. भा. व. वि. पोलीस आयुक्तालय नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक – ८६५७९३६९४२, ७०२१९९५३५२, ११२
