मिरारोड : काशिमीरा पोलिसांनी ०६ वर्षापासुन काशिमीरा, मिरारोड पुर्व येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अखेर केली अटक. अधिक माहितीनुसार दिनांक ११.०७.२०१६ रोजी मयत सचिन नारायण मोहीतेट वय-२५८ रा. १ बी, ३०६, पाटलीपुत्र कॉम्प्लेक्स, आनंद नगर, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई याचे आरोपी १ ) सत्याकुमार भागीरथी पानीग्रही उर्फ धिरेनकुमार पिल्ले उर्फ कुमार २) संदिप पोपट कुंभार ३) कपिल प्रभाकर जाधव ४) मल्या जगवंदु बारीक उर्फ बाबु ५)अकलाक इरशाद हुसैन खान उर्फ चाँद तसेच त्याचे साथीदार आरोपीत ६ ) सुधीर मयाशंकर शुक्ला ७)अमिर गुलाल रसुर तांबे ऊर्फ अम्मु ८ ) सय्यद जफरहुसेन जाफर हुसेन रिझवी ९) मोहमंद राशीद मोहमंद शफिक कुरेशी तसेच पाहीजेत आरोपी १०) प्रमोद जेना ऊर्फ निलु ११) सौम्यराज खिरोद दास यांनी आपसात संगनमत करुन मयत सचिन नारायण मोहीतेट हा यापुर्वी घेतलेले ३९ लाख रुपये परत देत नाही याचा मनात राग धरुन त्याचे अपहरण केले व त्याला आरोपी सत्याकुमार पानीग्रही याच्या गोरेगांव, मुंबई येथील ऑफीसमध्ये नेवून मारहाण केली तसेच काशिमीरा, मिरारोड पुर्व येथील आर. के. प्रिमीयम हॉटेल लॉजींग येथील रुममध्ये आणून पुन्हा त्याच्या पोटावर तसेच गुप्तांगावर लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केल्याने सचिन मोहिते याचे शरीर थंड पडल्याने तो मयत झाला असावा असे समजुन त्यास आरोपी सत्याकुमार पानीग्रही याच्या टोयोटा कोरोला गाडीत घालून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मनोर, जि. पालघर जवळील सुर्यानदीचे पुलावरुन वाहत्या पाण्याच्या प्रवाहात टाकून दिले याबाबत सफाळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला होता.
संजय देवराम निकुंबे, पोलीस निरीक्षक, गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष -३, गु.अ.वि., ना.म.जोशी मार्ग, मुंबई पोलीस दल यांना मिळालेल्या माहितीवरून वर नमुद आरोपी यांनी पैशाच्या कारणावरून सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वर नमुद आरोपी विरुध्द सफाळा पोलीस ठाणे, जिल्हा पालघर येथे गुन्हा दाखल करून गुन्हयाचे घटनास्थळ काशिमीरा पोलीस ठाणे हद्द असल्याने वरिष्ठांच्या आदेशाने सदरचा गुन्हा काशिमीरा पोलीस ठाण्यात वर्ग झाल्याने काशिमीरा पोलीस ठाण्यात दिनांक १२.०२.२०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयात वरील आरोपी क्र.०१ ते ०९ यांना अटक करुन त्याचेविरुध्द मा. न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते.
सदर गुन्हयातील आरोपी प्रमोद जेना ऊर्फ निलु तसेच सौम्यराज खिरोद दास हे गुन्हा घडले पासुन ०६ वर्षापासुन फरार होते. नमुद आरोपीचा शोध पोलिसांनी घेतला असता तो मिळुन येत नव्हता. आरोपी सौम्यराज खिरोद दास याचा सद्याचामोबाईल क्रमांक प्राप्त करुन त्याचा तांत्रीक माहितीच्या आधारे नमुद फरार आरोपी सौम्यराज खिरोद दास, वय-२७ वर्षे, रा. रुम क्र. १३०२, डी विंग, एव्हरशाईन, डी- १, रुस्तमजी ग्लोबल सिटी, विरार पुर्व, र मुळ रा. ग्राम बालीसाही, पोस्ट – बालीकुदा, जि. जगतसिंगपुर राज्य-ओरीसा हा ग्लोबल सिटी, जुने विवा कॉलेज, विरार, जि. पालघर येथे असल्याचे पोलिसांना समजल्यावर त्यास लागलीच ताब्यात घेवुन त्याची चौकशी केली असता सदर गुन्हयात त्याचा सहभाग निष्पन्न झाल्याने दिनांक १०.०५.२०२३ रोजी त्याला अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, श्री. श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त, श्री. जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ०१, श्री. विनायक नरळे, सहा.पोलीस आयुक्त (मुख्यालय), श्री. विलास सानप, सहा. पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली काशिमीरा पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदिप कदम, स.पो.नि. श्री. निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, स.फौ. अनिल पवार, पो.हवा.निलेश शिंदे,राहुल सोनकांबळे, पो. अंम. रविंद्र कांबळे, म.पो. अंम. धनश्री गुलदगडे यांनी केली आहे
