दि . १५. ०६ . २०२१ रोजी रोज वीला या जुन्या इमारतीतील पहिल्या मजल्या वरील घरातील छत कोसळून एकाच मृत्यू झाला.
भाईंदर पश्चिम येथील क्रॉस गार्डन भागातील रोज वीला नावाची जुनी इमारत असुन ती ब्रिटो कुटुंबाची आहे असे सूत्रांकडून सांगण्यात आले . सदर इमारत धोकादायक अवस्थेत आहे अशी महापालिके मार्फत नोटीस बजावण्यात आली होती . तरीही त्या इमारतीत रहिवाशी राहात होते . सोमवारी दुपारच्या वेळेस इमारतीतील पहिल्या मजल्या वरील एका सदनिकेचे छत कोसळले व छताखाली असलेल्या कॉमिल ब्रिटो वय ३९ हे गंभीर रित्या जखमी झाले त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या दुर्घटनेची बातमी समजताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पूर्ण इमारत रिकामी केली आहे.
