आज दिनांक २३/०७/२०२१ रोजी महानगरपालिका मा. अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार म्हसाळ व उपायुक्त (वैद्यकीय आरोग्य ) श्री. संजय शिंदे यांनी शहरातील सर्व खाजगी रुग्णालयातील डॉक्टर्स यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी शासनाच्या निर्देशनानुसार त्यांच्याकडील उपलब्ध सर्व बेड्सकरिता लागणाऱ्या दैनंदिन ऑक्सिजनच्या ३ पट साठक्षमता तयार ठेण्याबाबत सांगण्यात आले. सदर बैठकी दरम्यान वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश जाधव व खाजगी रुग्णालय डॉक्टर्स उपस्थित होते.
सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूची लागण झालेली आहे. सदर रोगाचा प्रसार टाळण्यासाठी शासनाने राज्यभर प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत . दुसऱ्या कोविड लाटेमध्ये मोठा प्रमाणात कोविड रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते. त्याचप्रमाणे काही वेळेस ऑक्सिजन च्या कमतरतेमुळे रुग्णांना इतर रुग्णालयात देखील हलविण्यात आले होते. तथापि दुसऱ्या लाटेमधे आलेल्या अडचणींचा विचार करता संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये अशा प्रकारची गैरसोय होऊ नये , याकरिता मा. उपायुक्त (वैद्यकीय आरोग्य ) श्री. संजय शिंदे यांनी ऑक्सिजचा साठा उपलब्धतेबाबत महत्वाच्या सूचना दिल्या आहते.
ज्या खाजगी रुग्णालयास पालिकेने ” कोविड रुग्णालय ” म्हणून मान्यता दिली आहे तसेच कोविड रुग्णांना ऑक्सिजन कमी पडून त्यांच्या जीवितास कुठलाही धोखा झाल्यास संपूर्ण जबाबदारी संबंधित रुग्णालयाची राहील . शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सर्व खाजगी रुग्णालयांनी ३ पट ऑक्सिजन साठा क्षमता येत्या १० दिवसात उपलब्ध ठेवण्याचे निर्देश मा. अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार म्हसाळ व उपायुक्त (वैद्यकीय आरोग्य ) श्री. संजय शिंदे यांनी खाजगी रुग्णालय डॉक्टरांना दिले.
