मुंबई – पालघर जिल्ह्यातील स्वदिच्छा साने वय:२२ हि २९ नोव्हेंबरला २०२१ रोजी MBBS च्या परीक्षेकरिता बांद्रा येथे गेली असता ती आजतागायत परत आली नाही. या मुलीचा अनेक ठिकाणी शोध घेतला असला तरीहि कुठेही थांगपत्ता लागत नसून वांद्रे पोलिसांसाठी हि केस आव्हानात्मक झाली आहे. आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी पहिल्या सत्रात तीन लक्षवेधी प्रश्न विचारले. मुंबईत सध्या किती सी सी टीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत तसेच स्वदिच्छा साने हिचा तपास क्राईम ब्रँच कडे सोपविला जाणार का? व सध्या सोशल मीडियावर महिला सोबत सायबर बुली म्हणजेच सोशल मीडियावर महिलांना ट्रोल करणे, महिलांविरोधात अश्लील भाषेत टीका टिपण्णी करणे याचे प्रमाण वाढत असून शासन व फेसबुक (मेटा ) यावर एकत्रीत येऊन कारवाई करणार आहेत का ? असे तारांकित प्रश्न विचारून या प्रकरणाचा पाठपुरावा केला. या प्रश्नाला उत्तर देताना गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी उत्तर देताना सांगितले स्वदिच्छा साने यांचा शोध सुरूअसून सी सी टीव्हीच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या माहितीनुसार मुंबई पोलीस योग्य ती कारवाई करीत आहे व पुढील तपास क्राईम ब्रँचकडे सोपवणार आहोत, तसेच सध्या मुंबईत पाच हजार सी सी टीव्ही कार्यरत असून अजून सी सी टीव्ही लावण्यात येणार असल्याचे सांगितले. शासन व सोशल मीडिया चालविणाऱ्या कंपन्या या एकत्रित काम करीत असून महिलांच्या सुरक्षेला नेहमी प्राध्यान असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.
