मिळालेल्या माहितनुसार नालासोपारा येथे एक इसम गांजा अंमली पदार्थ स्वतःक्या कब्ज्यात बेकायदेशीर रित्या बाळगत असल्याची गुप्त बातमी वालीव पोलीस ठाण्याला मिळाली.
माहिती मिळताच वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चद्रकांत सरोदे व गुन्हाप्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांच्यासह सदर ठिकाणी सापळा लावून आरोपींना पकडण्यात आले. या गुन्ह्यात २ आरोपी असून पाहिल्या आरोपीचे वय-२४ वर्षे आणि दुसऱ्या आरोपीचे वय ३२ वर्षे आहे.
दोघेही राहायला नालासोपारा (पूर्व) सदर आरोपींच्या कब्ज्यातून २किलो २६१ ग्रॅम वजनाचा गांजा एकूण किंमत २२,६१६/- रुपये किमतीचा बाळगत असताना मिळून आल्याने त्यांच्या विरूद्ध वालीव पोलीस ठाणे गुन्हा रजि क्र. १५९/२०२१ एन. डी.पी. एस. कायदा १९८५ चे कलम ८(क), २२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
वरील कामगिरी श्री. प्रशांत वांघुडे, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-३ विरार, श्री अमोल मांडवे, सहायक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, वालीव पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विलास चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हाप्रकटीकरण अधिकारी व अंमलदार यांनी पर पडली.
