विरार पोलीस ठाणे हद्दीत वाढती चोरी, घरफोडी व चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथक व रात्रपाळीस असणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस ठाणे हद्दीत सतर्क गस्त करणे, ओ.टी.एम. सेंटर्स व इतर महत्वाच्या ठिकाणी वारंवार भेटी देवुन गुन्हे प्रतिबंधक गस्त करण्याच्या सुचना देण्यात आल्या होता त्यानुसार दिनांक २५/१०/२०२१ ते दिनांक २६/१०/२०२१ रोजी विरार पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पो.ह. विष्णु वाघ, पो.ना.संग्राम कोकरे व बीट मार्शल पो.शि. दत्ता जाधव हे विरार पश्चिम बीट चौकी येथे गस्त करीत असताना रात्रौ ०२.०० वा चे सुमारास डोंगरपाडा विरार(प) या ठिकाणी बसथांब्याचे मागे तीन इसम हे संशयास्पद उभे असलेले मिळून आले त्यांच्या जवळ जावुन त्यांना त्याचे नाव विचारले असता त्यांच्या संशयास्पद हालचाली वाढु लागल्या म्हणुन पोलिसांनी आपले अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे यांना कळविले. त्यावेळी लागलीच पोउनि राणे व पथक दोन पंचाना घेवुन घटनास्थळी आले व तीनही इसमांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) शिवमकुमार संजयकुमार तिवारी वय २० वर्षे रा. वाकीपाडा नायगाव पुर्व २) जितेंद्रकुमार हृदयनारायण सिंग वय २१ वर्षे रा. वाकीपाडा नायगाव पुर्व ३) अलोककुमार मुन्ना सिंग वय २३ वर्षे रा. वाकीपाडा नायगाव पुर्व ता.वसई जि.पालघर असे सांगितले. सदर इसमांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे १) १५ से.मी लांब लोंखडी गोल नळीचा व १० से.मी लांब लाकडी मुठीचा एक गावठी कट्टा व ८ एम.एम.चे ४ जिवंत काडतुसे २) ३ टॉर्च ३) एक काळ्या पिवळ्या रंगाचे एक्सा ब्लेड, ४) ३ लहान मोठया आकाराचे लोंखडी स्क्रू ड्रायव्हर व ऍडजेस्टेबल ५ स्क्रु ५) अंदाजे २४ से.मी लांबीची एक लोंखडी हातोडी, ६) एक ग्लास कटर, ७) एक पक्कड ८) दोन मोबाईल मिळून आले या वस्तू त्यांच्याकडे कश्यासाठी आहेत हे पोलिसांनी त्यांस विचारले असता त्यांनी उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे दिल्यामुळे त्यांचेकडील वस्तु जप्त करुन आरोपी चोरी करण्याचे उद्देशाने सकाळ पासून रात्रीपर्यंत लपून कोणताही परवाना नसताना शस्त्र बाळगल्या प्रकरणी त्यांना विरार पोलीस ठाणे इथे गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे . तसेच त्यांच्याकडे वरील सामान कसे आले याबाबत चा पुढील तपास विरार पोलीस ठाणे करीत आहे .
सदरची चांगली कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त, परि.३ श्री. प्रशांत वाघुडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, विरार विभाग श्री. रामचंद्र देशमुख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. संदेश राणे, पो.ह. विष्णु वाघ, पो.ना. संग्राम कोकरे, बीट मार्शल पो.शि. दत्ता जाधव व पो.शि. सागर घुगरकर यांनी केली आहे.
