पालघर (पूर्व) येथील पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या वरखूंटी रोडवरील आनंदी बस स्टॉपच्या जानबाई यांची नवीन बनत असलेल्या बिल्डिंगच्या दुकानांमध्ये आरोपी नामे. ब्रिजेश राजेंद्र शाहू (वय-४०) राहायला कुंती नगर, नवली वरखंडे रोड, पालघर (पूर्व) तालुका.जिल्हा.पालघर महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित करण्यात आलेल्या तंबाखूजन्य पदार्थ गुटखा (सुगंधित सुपारी व पानमसाला) विक्री करण्यासाठी स्वतः जवळ ठेवला होता.
सदरची घटना दिनांक.१९/१२/२०२० रोजी ३:३० वाजताच्या सुमारास घडली आरोपी ब्रिजेश शाहू यांच्या ताब्यातून तब्बल १) ९,८४९/- रुपये किंमतीचे ६७ पॅकेट २) ५,२५०/- रुपये किंमतीचे १५० पॅकेट ३) २३,१००/- रुपये किंमतीचे १६५ पॅकेट ४) ४,२२१/- रुपये किंमतीचे ६७ पॅकेट ५) ९,८४०/-रुपये किंमतीचे ८२ पॅकेट ६) २,७७२/- रुपये किंमतीचे १४ पॅकेट ७) २,०८०/- रुपये किंमतीचे १३ पॅकेट ८) १८,०००/- रुपये किंमतीचे १५० पॅकेट ९) ४,५००/- रुपये किंमतीचे १५० पॅकेट १०)१,२६०/- रुपये किंमतीचे १८ पॅकेट ११) ३,०८०/- रुपये किंमतीचे ७० पॅकेट १२) १,६२०/- रुपये किंमतीचे ५४ पॅकेट असा एकूण ८५,५७२/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपीविरुद्ध पालघर पोलीस ठाणे गुन्हे रजि क्र. ३११/ २०२० भा.द.वि.स.क. -१८८, २६९,२७० अन्न सुरक्षा अधिनियम मानक अधिनियम २००६ कलम -०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगीरी पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र नाईक प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पालघरचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी केली.
