सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डहाणू येथील घोळ टोल नाका मुंबई वाहिनीवर ह्युदाई वेरना या कार मधून तंबाखूजन्य आणि विषारी पदार्थांचे आयात निर्यात करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली. शरीरास प्राणघातक असल्याची पुरेपूर कल्पना असून देखील अशा विषारी पदार्थांची आयात निर्यात केली जात होती, या गुन्ह्याची कडक कारवाई सहा.पोलीस निरीक्षण उमेश पाटील आणि प्रभारी अधिकार कासा पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या गुन्ह्यात दोन आरोपी सामील असून त्यांची नावे,१) गुलमोहम्मद साफिया अहमद खान, वय-३६वर्ष २)शावान जुबेर अहमद शेख वय २२-वर्ष यांच्यावर १७८/२०२० कलम भा.द.वि. कलम ३२७,२७२,२७३,१८८,३४ अन्न सुरक्षा मा.न.दे.का. २००६ चे. कलम. २६ (२) (आय), २७(१), ३०(२) (ए), ३(१) (झेड.झेड) (आय), ३(१) (झेड.झेड) (व्हि) शिक्षा कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करून १९ ऑक्टोंबर रोजी अटक करण्यात आली.
आरोपींच्या ताब्यातून तब्बल:
१)३८,८४८/ रु. किंमतीचे ८ प्लॅस्टीकच्या गोणी त्यामध्ये केसर युक्त विमल पान मसाला, बोलो जुबा केसरी ब्ल्यू रंगाचा पाकीट प्रत्येक गोणीमध्ये २२ पाकिट असे एकूण १७६ पाकिटे
२)२४,९६०/ रु.किंमतीचे प्लॅस्टीकच्या गोणी त्यामध्ये केसर युक्त विमल पान मसाला बोलो जुबा केसरी, केसरी रंगाचे पाकीट,प्रत्येक गोणीमध्ये ५२ पाकीट असे एकूण २०८ पाकीटे
३)३७,४००/ रु.किंमतीचे प्लॅस्टीकच्या गोणी त्यामध्ये केसर युक्त विमल पान मसाला बोलो जुबा केसरी काळे निळे रंगाचे पाकीट प्रत्येक गोष्टीमध्ये ५०पाकीटे असे एकूण २०० पाकीटे
४)५,१४८/रु.किंमतीचे ३ प्लॅस्टीकच्या गोणी त्यामध्ये एक तंबाखू काळे-निळे रंगाचे पाकीट प्रत्येक गोणीमध्ये ५२पाकीट असे एकूण १५६ पाकीटे
५) ६,२४०/रु.किंमतीचे ४ प्लॅस्टीकच्या गोणी त्यामध्ये वि-१ तंबाखू केसरी रंगाचे पॅकेट प्रत्येक गोणीमध्ये ५२ पाकीट असे एकूण २०८ पाकिटे
६) ४,६२०/ रु. किंमतीचे १० लहान प्लॅस्टीकच्या गोणी त्यामध्ये वि- १ तंबाखू जांभळ्या रंगाचे पॅकेट प्रत्येक गोणीमध्ये २१ पाकीट असे एकूण २१० पाकिटे
७)३,००,०००/ रु. किंमतीची ब्लू रंगाची ह्युंदाई वेरना कार नंबर एम. एच.०४. डी.एन.७१९८ जु.वा.किं.सु असा एकूण ४,१३,२१६ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच अशा प्रकारच्या तंबाखूजन्य आणि विषारी पदार्थांची निर्यात कुठेही आढळली तर त्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. शरीराला इजा करणारे आणि प्राणघातक असतील अशा कोणत्याच अन्नपदार्थांचे सेवन करू नये आणि त्यांची आयात निर्यातही देखील करू नये असे आव्हान कासा पोलीस ठाणे जनतेला दिले आहे. या प्रकरणामुळे मुंबईतील सर्व टोल नाक्यावर येणाऱ्या प्रत्येक वाहतूक मालाची काटेकोर पद्धतीने तपासणी केली जात आहे.
