भाईंदर(दि.१): वेश्याव्यवसाय करणा-या महिला वेश्यादलालास ताब्यात घेवुन ०१ अल्पवयीन व ०२ पिडित मुलींची सुटका – अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर पथकाची कामगिरी.सविस्तर माहिती अशी कि अनैतिक मानवी वाहतुक कक्ष, भाईंदर पथकास दिनांक ३१.०५.२०२३ रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मिरारोड येथे राहणारी महिला वेश्यादलाल रागिनी वर्मा ही वेश्याव्यवसाय करीत असुन तिच्या मोबाईल वर पुरुष गि-हाईकाने संपर्क साधला कि ती व्हाटसऍप वरून पुरुष गि-हाईकांना अल्पवयीन मुली तसेच महिलांचे फोटो पाठवुन त्यांच्याशी संपर्क साधुन मिरा-भाईंदर परिसरातील लॉजमध्ये गि-हाईकास रुम बुक करावयास लावुन किंवा गि-हाईकाचे सोयीनुसार शॉर्ट टाईमसाठी वेश्यागमनाचा मोबदला घेवुन पुरुष गि-हाईकास वेश्यागमनासाठी अल्पवयीन मुली व महिला पुरविते.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतुक कक्ष, भाईंदर पथकाचे पो.नि.श्री. समीर अहिरराव यांनी कायदेशीर बाबींची पुर्तता करुन त्या महिला वेश्यादलाल हिस रंगेहात पकडण्यासाठी छापा कारवाई करण्यासाठी बोगस महिला गि-हाईक व पंच तयार करून त्यांना तिने सुचविल्याप्रमाणे वर्धमान फॅन्टासीचे मेन गेटजवळील फुटपाथ, शिवार गार्डन, मिरारोड पुर्व येथे पाठविले असता महिला वेश्यादलाल रागिनी वर्मा हिने बोगस गि-हाईकास मुलींचे फोटो पाठवुन ०१ अल्पवयीन व ०२ पिडित मुली असे एकुण ०३ मुलींना सोबत घेवुन बोगस गि-हाईकास दाखवुन त्यांना वेश्यागमनासाठी प्रवृत्त करुन वेश्यागमनाच्या मोबदल्यात रक्कम ठरवुन स्वत:च्या उपजिवीकेकरीता रक्कम स्वीकारल्याने तिला पोलिसांनी इतर मुद्देमालासह ताब्यात घेवुन मुलींची सुटका केली. सदर बाबत स.फौ. पाटील यांनी सकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन महिला वेश्यादलाल रागिनी वर्मा हिच्या विरुध्द मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री.अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक कक्ष, भाईंदर पथकाचे पो. नि. श्री. समीर अहिरराव, स.फौ. विजय निलंगे, रामचंद्र पाटील, पो. अंम. केशव शिंदे, चा. पो. हवा. सम्राट गावडे, महिला पो.अंम. अश्विनी भिलारे, महिला म. सु. ब. शुभांगी मोकल यांनी केली आहे.
