मिरारोड : दिनांक २. ०७. २०२१ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वपोनि. श्री. एस.एस. पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली कि , ‘ वेश्यादलाल गीता वर्मा हि पुरुष गिऱ्हाईकांकडून पैसे स्विकारुन पुरुष ग्राहकांना वेश्यागमनाकरिता मुली असून मॉंजिनीस केक शॉप , तुंगा हॉस्पिटल जवळ , मिरा भाईंदर रोड, मिरा रोड पूर्व या ठिकाणी वेश्यागमनाकरिता पुरुष गिऱ्हाईकांना मुली पुरविणार आहे. त्यामुळे मिळालेल्या बातमीवरून वपोनि . श्री. पाटील यांनी पथकासह नमूद ठिकाणी बोगस गिऱ्हाईक व पंच यांना पाठवुन सत्यता पडताळून छापा टाकला असता महिला वेश्यादलाल गिता राजकुमार वर्मा वय : २० रा. काशिमीरा मूळ रा. छत्तीसगड हि वेश्यागमनासाठी ग्राहकांकडून पैसे स्विकारुन मुली पुरवीत असतांना मिळून आल्याने तिचेकडून वेश्यागमनाकरिता स्विकारलेल्या रक्कमेसह ताब्यात घेवुन ०२ मुलींची सुटका करण्यात आली आहे . सदर बाबत महिला वेश्यदलाल हिचे विरुद्ध नवघर पोलीस ठाणे येथे पो.हवा उमेश पाटील यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई डॉ . श्री. महेश पाटील , पोलीस उप.आयुक्त (गुन्हे) , श्री. रामचंद्र देशमुख , सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे ) यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षभाईंदर विभागाचे व.पो. नि . श्री. संपतराव पाटील , पोहवा. उमेश पाटील, रामचंद्र शिवाजी पाटील, म. पो. ना. यंम्बर , कमल चव्हाण, पो.शि. केशव शिंदे, चालक पोना . गावडे यांनी केली आहे.
