दिनांक १३/०२/२०२१ रोजी अंतःपुरा लॉजींग एण्ड बोडींगमध्ये अवैथ्य वेश्याव्यवसाय चालु असल्याची बातमी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली.
बातमी मिळताच कक्षाच्या पथकाने अंतःपुरा लॉजींग एण्ड बोर्डीगच्या पार्किगंमध्ये छापा टाकुन दोन पिडीत महिलेची वेश्या व्यवसायातुन सुटका करुन दिली.
वेश्यागमनास प्रवृत्त करणारे आरोपी नामे (१) आशिकसाहेब मोहम्मद इब्राहिम शेख, बय-२७ वर्षे,राहायला नालासोपारा (पुर्व).ता वसई, जि ठाणे, २) श्रीमती, वय-२५ वर्षे,रा- नालासोपारा यांना ताब्यात घेतले असुन आरोपींविरुध्द नयानगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ६२/२०२१ भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३७०, ३४ अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री विजयकांत सागर, पोलीस उपआयुक्त गुन्हे, श्री अमित काळे, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-१ यांचे मार्गदर्शनाखाली अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री भास्कर पुकळे, पो हवा. पाटील, आसवले, डेमरे, निलंगे, महिला पो.हवा. धानवा व पथकाने केली आहे.
