भाईंदर : दिनांक ०७.०५.२०२२ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकाचे सहा.पोउपनि. उमेश पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, महिला वेश्यादलाल ज्योत्स्ना उर्फ ज्योती रा. वसई ही महिला तिच्या संपर्कातील पुरुष गि-हाईकांना मुलींचे फोटो पाठवून गि-हाईकांच्या पसंतीनुसार वेश्यागमनाच्या मोबदल्यात मिरा-भाईंदर, वसई-विरार परिसरातील लॉजवर मुली पुरविते.
मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री एस एस पाटील यांनी बोगस गि-हाईक व पंच यांना शांती शॉपिंग सेंटर पूर्व मधील गाळा क्र. ए/३०, शांतीसागर हॉटेल, मिरारोड रेल्वे स्टेशन जवळ, मिरारोड पूर्व या ठिकाणी पाठवुन सत्यता पडताळुन पाहण्यासाठी पोलीस पथकासह दिनांक ०७/०५/२०२२ रोजी छापा टाकला असता महिला वेश्यादलाल ज्योत्स्ना उर्फ ज्योती देवायत राम हिने वेश्यागमनाच्या मोबदल्यात पुरुष गि-हाईक सहा. पोलीस आयुक्त, कडुन रक्कम स्वीकारल्याने तिस ताब्यात घेवुन दोन मुलींची सुटका करण्यात आली आहे . सदर बाबत सपोउपनि उमेश हरी पाटील यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन महिला आरोपी ज्योत्सना उर्फ ज्योती देवायत राम विरुध्द नयानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला दलालास अटक करण्यात आले आहे.
सदरची कारवाई डॉ. श्री महेश पाटील, पोलीस उप.आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संपतराव पाटील, सपोनिउनि उमेश पाटील, विजय निलंगे, रामचंद्र पाटील, पोशि/ केशव शिंदे, मपोहवा/ वैष्णवी यंबर, मपोहवा/ सुप्रिया तिवले, चा.पोहवा/ गावडे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर यांनी केली आहे.
