दिनांक २३/०७/२०२१ रोजी वालीव पोलीस ठाणे हद्दीत बातमी मिळाली की, मौजे पेल्हार गावातील खान कंपाउंड मधील चाळीमध्ये एक तृतीयपंथी व एक परराज्यातील महिला रूममध्ये कोरोना काळात बेरोजगारीतून त्रस्त असलेल्या तरुण मुली ठेवून त्या पुरुष गिऱ्हाईकांना वेश्यागमनाकरिता पुरवून सदर ठिकाणी वेश्याव्यवसाय चालवीत आहे , अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन व कारवाई पुर्व परवानगी घेऊन श्री. मिलिंद साबळे , पोलीस निरीक्षक व वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व पुरुष / महिला अंमलदार यांनी बातमीची खात्री करणे कामी सापळा पुर्वी डमी गिऱ्हाईक पाठवले असता सदर ठिकाणी बातमीप्रमाणे वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची खात्री झाली. त्या आधारे सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता सदर चाळीतील बंद खोलीमध्ये बातमीप्रमाणे १. वसुंधरा संजय तिवारी व २. सौ . अंजली राजकुमार यादव उत्तरप्रदेश येथील राहणारी महिला मिळून आली . घटनास्थळी घराची झडती घेतली असता आतील खोलीमध्ये अंदाजे २५ ते ३० वयोगटाच्या ४ पीडित मुली मिळुन आल्या. पीडित मुलीकडे चौकशी केली असता माहिती समोर आली कि गेले वर्षभरापासून कोरोनासारख्या महामारीमुळे उद्भवलेल्या बेरोजगारीतून सर्व तरुण मुली वेश्यागमन सारख्या अनैच्छिक व्यवसायाकडे वळल्या होत्या व वरील दोन्ही आरोपी हे चारही पीडित मुलींकरवी पैशांचा मोबदला देऊन वेश्यागमन करीत असल्याचे सांगितले . सदर घराची बारकाईने झडती घेतली असता घरातून २,५३,४४०/- रुपये किमतीचे निरोध मिळून आले. सदर बाबत वालीव पोलीस दाखल करण्यात आला .
सर्व मुलींना ताब्यात घेऊन महिला सुधारगृह नागझरी बोईसर येथे ठेवण्यात आले आहे. दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना दिनांक २८/०७/२०२१ रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करण्यात आली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पो . नि. साबळे हे करीत आहेत .
सदरची कामगिरी श्री संजयकुमार पाटील , पोलीस उपआयुक्त परिमंडळ -२, श्री अमोल मांडवे , सह. पो. आयुक्त , तुळींज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाण्याचे वपोनि. श्री विलास चौगुले , पोनि . श्री राहुलकुमार पाटील , श्री मिलिंद साबळे , तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि . ज्ञानेश फडतरे , पो. अंम . योगेश देशमुख , मनोज मोरे, मुकेश पवार , किरण म्हात्रे , सचिन दोरकर, अनिल सोनवणे, राजेश फड , विनेश कोकणी, सचिन बलीद , बालाजी गायकवाड यांनी केली आहे .
