दिनांक २२/०५/२०२१ रोजी. विष्णुनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हादाखल असुन सदर गुन्हयातील हया त्यांचे पती सोबत रस्त्याने भागशाळा मैदान येथे वॉकींग करीता गेल्या असता, अनोळखी इसम हा त्याच्याकडील सफेद रंगाच्या गाडीवर येवुन फिर्यादी यांच्या गळयातील ४९,५००/-रू किंमतीचे १८.५ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे मंगळसुत्र खेचुन नेऊन चोरी करून पळुन गेले आहे म्हणुन गुन्हा दाखल झाला होता.सदर गुन्हयाचा तपास हा विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी स.पो.नि गणेश वडणे व पथक यांनी तांत्रिक विश्लेषनाच्या मदतीने व गुप्त बातमीदार मार्फतीने इसम फजल आयुब कुरेशी, वय – २५ वर्षे, रा. कल्याण यास अटक करुन गुन्हयातील फिर्यादी यांच्या गळयातील ४९,५००/-रू किंमतीचे १८.५ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे मंगळसुत्र आरोपीतांकडुन हस्तगत केलेली आहे.
दिनांक २२/०५/२०२१ रोजी विष्णुनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयातील रहिवाशी हा जुने पोलीस स्टेशन समोरील रेल्वे ब्रिजवरील पायऱ्यांवरुन घरी जात असतांना यातील तीन अनोळखी इसमांनी त्याचा मोबाईल हिसकावुन घेवुन शिविगाळ करत त्याचा सॅक (बॅग) मधील ३,०००/-रु. रोख जबरदस्तीने काढून घेतले व मारहाण केली तसेच मोबाईल फोन मधून १२,०००/-रु. आरोपीने फोनेपे ने स्वतःच्या आरोपीने फोनेपे ने स्वतःच्या अकाऊंट मध्ये ट्रान्सफर करुन घेवुन निघून गेले सदर गुन्हयाचा तपास हा विष्णुनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी स.पो.नि गणेश वडणे व पथक यांनी तांत्रिक विश्लेषनाच्या मदतीने व गुप्त बातमीदार मार्फतीने १) वासीम नुरमोहम्मद शेख वय २७ वर्षे रा. जानु टावर मुंब्रा २) मुनाफ अब्दुल रशीद सय्यद वय २७ वर्षे रा. मुंब्रा ३) इम्रान अब्दुल मुनाफ मोमीन वय ३० वर्षे रा मुंब्रा कौसा यांना दिनांक:२९/०८/२०२१ रोजी ०१.३० वाजता डोंबिवली बाजारपेठ येथुन अटक करुन गुन्हयातील फिर्यादी यांचे १५,०००/-रू रोख आरोपीकडुन हस्तगत केले.
दिनांक १२/०५/२०२१ रोजी . सकाळी ०८:३० ते ०८.५० वाजताच्या सुमारास विष्णुनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयातील फिर्यादी यांचा उघडया दरवाजावाटे कोणीतरी अज्ञात चोरटयाने प्रवेश करून घरीतील २२,०००/-रू किंमतीचा मोबाईल फोन तसेच व साक्षीदार यांचे सुध्दा मोबाईल फोन संमतीशीवाय लबाडीने चोरून नेला. सदर गुन्हयाचा तपास हा विष्णुनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी स.पो.नि गणेश वडणे, पोना. बी के सांगळे व पथक यांनी गुप्त बातमीदार मार्फतीने सतिश भिमराव वाळके, वय – २८ वर्षे, रा. मांगवाडी, यास दिनांक:३०/०८/२०२१ अटक करुन गुन्हयातील फिर्यादी व साक्षीदार यांचे चोरीस गेले मोबाईल फोन पैकी ६,०००/-रू किंमतीचा Lenovo k6 Power कंपणीचे एक मोबाईल फोन आरोपीकडुन हस्तगत केलेला आहे.
विष्णुनगर : दिनांक:०६/०७/२०२१ रोजी ०८.१४ वा विष्णुनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा करण्यात आला होता कि अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश करून घरातील बेडरूममध्ये लोखंडी कपाटाच्या तिजोरी मधील सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, असा एकुण १,२६,२०० /रु किं चे अंदाजे ४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीच्या पायातील मासेळी एक जोडी जु.वा.असा माल घरफोडी चोरी करून नेला. सदर गुन्हयाचा तपास हा विष्णुनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिल्लारे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी स.पो.नि गणेश वडणे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा.आर डी पाटणकर, पोहवा. के.एम.नलावडे पोशि. के ओ भामरे व पथक यांनी तांत्रिक विश्लेषनाच्या मदतीने व गुप्त बातमीदार मार्फतीने इसम किसन महादेव व्हनकोरे, वय-२५ वर्षे राह. धाकटा खांदा, पनवेल, नवी मुंबई हा पनवेल रेल्वे ब्रिजवळ येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा रचुन त्यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला असता त्यास नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त सो, परिमंडळ – ३, कल्याण श्री. विवेक पानसरे सो व मा. सहायक पोलीस आयुक्त सो, डोंबिवली विभाग, डोंबिवली श्री. जयराम मोरे सो, डोंबिवली विभाग व प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिल्लारे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी स.पो.नि गणेश वडणे, याचे मार्ग दर्शनाखालीपोहवा. के.एम.नलावडे पोहवा. आर डी पाटणकर पोहवा. एस एन नाईकरे, पोना. बी के सांगळे, पोना. टि.एच.लोखंडे, पोना. एस.के.कुरणे पोशि. के अ भामरे, पोशि. एम एस बडगुजर, पोना. एस एस कांगुनेपोशि.व्हि. एस महाजन यांनी सदरची करवाई यशस्वी पणे पार पाडली आहे.
