कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशन फलाट क्र ५ वरून रेल्वे स्लो धावत असताना शारदादेवी प्रेमचंद कनोजिया वय – ४० राह सांताक्रुज पुर्व, यांच्या हातातील पर्स मोहम्मद फरीद निजाम खान वय ३० वर्षे, फुटपाथ कल्याण, याने जबरदस्तीने खेचून चोरून चालू गाडीतून उतरून पळून जात असताना त्यांनी आरडाओरड केली असता ड्युटीवरील पोलीस व RPF यांनी त्यास पकडून त्याची अंगझडती घेतली असता १) ४०० /- रू. कि एक पिस्ता रंगाची लेडीज पर्स त्यात- २) ७०० /- रुपये रोख ३) १२,००० /- रू.किं.चा एक Realme कंपनीचा निळसर रंगाचा मोबाईल फोन मॉडेल नं.RMX2103, जु.वा. ४) ६, ००० /- रू.किं.चे चांदीचे साखळी डिझाईन असलेले पैंजणजोड व मासोळीजोड, त्याचे वजन ८८ ग्रॅम अंदाजे. ५) २,५००/- किं.चे कानातील सोन्याचे सुईधागा वजन ५०० मिली ग्रॅम अंदाजे एकुण- २१,६००/- रूपये. एकुण चा मुद्देमाल मिळून आला . नमुद इसमा विरूध्द तक्रार नोंदवुन गुन्हा दाखल करून नमुद आरोपीस सदर गुन्हयात अटक करण्यात आले.
दादर : दि. २५/०८/२०२१ रोजी भल्ला गद्दी नायक वय २४ वर्ष रा. मच्छीमार्केट विक्रोळी पूर्व बृहन्मुंबई. यास १) जयंतीलाल चुन्नीलाल प्रजापती वय ४४ वर्ष. रा.पावटि राजस्थान २) गोपाल प्रफुल्ल स्वाय वय.२८ वर्ष रा.दादर नायगाव यांनी रेल्वेचे तिकीट स्मार्ट कार्ड काढून देतो असे सांगून भल्ला नायक यांच्याकडून ५००/- घेऊन फसवणूक करून पळूत जात असताना पाठलाग करुन मध्य परिमंडळ निर्भया पथकातील WHC इंगवले, WHC कळंबे यांनी वरील दोन आरोपीस रंगेहाथ पकडले. वरील आरोपी विरुद्ध दादर रेल्वे पोलिस ठाणे येथे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
