विरार पोलीस ठाणे हद्दीत वाढते घरफोडीचे चोरीचे घटनांना आळा घालण्यासाठी श्री.दत्तात्रय शिंदे, पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक, यांचे सुचनेप्रमाणे श्री.विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधीक्षक वसई, श्रीमती रेणुका बागडे, उपविभागिय पोलीस अधिकारी विरार, यांचे मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाणे नेमणुकीतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे एक पथक तयार करुन गुप्त बातमीदार यांचे बातमीचे सहाय्याने आरोपी वैजनाथ मारूती सावडे वय २४ वर्षे रा- जिवदानी कृपा चाळ, रूम नं. ०४, सहकार नगर, विरार पुर्व ता.वसई जि. पालघर मुळ रा.यलदरी, ता.जिंतुर, पोस्ट- शेनगांव, जि.परभणी यास दिनांक ०९/०९/२०२० रोजी १७.१३ वाजता अटक करण्यात आली आहे. त्यांचे कडून विरार पोलीस ठाण्यातील खालील गुन्हे उघडकीस आणून त्यांचे कडून एकूण १,३२,५००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने व २९,५००/- रु कि चे ०६ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. सदर गुन्हे उघडकीस आणनेकामी सायबर सेल, पालघर नेमणुकीतील अधिकारी व कर्मचारी यांनी मदत केलेली आहे.
सदरची कामगीरी श्री.सुरेश वराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विरार पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उप निरीक्षक संदेश राणे, सफौ/राजेश वाघ, पो.हवा./सचिन लोखंडे, पो.ना./सचिन घेरे, पो.ना./विजय दुबळा, पो.ना/हर्षद चव्हाण, पो.ना./भुषण वाघमारे, पो.शि./इंद्रनिल पाटील, पोशि/विशाल लोहार, पो.शि./सुमित जाधव, पो.शि/रवी वानखडे, पो.शि./सुनिल पाटील
