दिनांक १४/०९/२०२० रोजी ११-०० वाजता घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील डहाणु कोसबाड रोडवर वाकी आश्रमशाळेजवळ ता.डहाणु जि.पालघर आरोपी १) पांडु काशा दळवी वय २५ वर्षे रा.जामशेतगोरवाडी ता.डहाणू जि.पालघर व एक अज्ञात इसम यांनी आपल्या स्वताच्या फायदयाकरीता गौण खनिजाची चोरी करुन पिकअप क्रमांक एम.एच.०४.डी.डी.८३७४ हीचे मधून वाहतुक करत असतांना मिळून आला. आरोपी यांचे ताब्यातुन १)१,००,००० रुपये किंमतीची टाटा कंपीनीची सफेद रंगाची पिकअप क्रमांक एम.एच.०४.डी.डी.८३७४ जु.वा.कि.सू. २)२५,००० रुपये किंमतीची समुद्राची सिंमेटच्या पोत्यामध्ये अर्धवट रेतीने भरलेली ९० पोती कि.सु. असा एकुण १,२५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी यांचे विरुध्द घोलवड पोलीस ठाणे गु.र.नं. ा ७४/२०२० भा.दं.वि.सं.कलम ३७९, ३४ सह महाराष्ट्र जमिन अधिनियम १९६६ चे कलम ४८, ७ केंद्रीय गौण खनिज कायदा कलम ८४ (७) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपी क्रमांक १ यास दिनांक १४/०९/२०२० रोजी अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश सोनवणे, प्रभारी अधिकारी, घोलवड पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली घोलवड पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.
