सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वालीव पोलीस ठाणे गु.रजि.नं. ॥ ३५२/२०२१ भादविस कलम ३७९ प्रमाणे दाखल वाहन चोरीच्या गुन्हयातील आरोपीत याचा शोध घेत असतांना तांत्रिक माहीती व गुप्त बातमीव्दारे माहीती घेऊन वाहन चोरी करणारा आरोपी नामे. विमलेश बेचु वर्मा वय ३१ वर्षे राहायला उत्तरप्रदेश आरोपी यास दिनांक ०३.०४.२०२१ अटक करुन त्याचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेले मोटार सायकल हस्तगत केली.
आरोपीकडे अधीक विचारपुस केली असता त्याने वालीव, तुळींज, मिरारोड व मुंबई परीसरातुन वाहन चोरी केल्याची कबुली देवुन चोरीच्या ६ मोटार सायकल काढुन दिल्या.
आरोपी याचे कडुन वालीव पोलीस ठाण्याचे ३ मोटार सायकल, तुळींज पोलीस ठाण्याचे १ मोटार सायकल व मिरारोड, मुंबई परीसरातील २ मोटार सायकल असे एकुण ६ वाहन १,३५,०००/- रुपये किंमतीच्या हस्तगत करण्यात आले असुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकिस आले आहेत.
सदरची कामगीरी श्री.प्रशांत वाघुडे,पोलीस उपायुक्त, परीमंडळ-३ तसेच श्री अमोल मांडवे, सहायक पोलीस आयुक्त,तुळीज यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विलास चौगुले, पोलीस निरीक्षक श्री.चंद्रकांत सरोदे, पोलीस निरीक्षक श्री.दादासाहेब कारांडे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि ज्ञानेश फडतरे आणि पथक यांनी केलेली आहे.
