दिनांक : १/१०/२०२१ : वालीव पोलीस ठाणे ०५, मुंब्रा पोलीस ठाणे ०१, कळवा पोलीस ठाणे ०१, असे एकूण ०७ वाहन चोरीचे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते . त्यानुसार या गुन्ह्यांचा शोध घेवून वाहन चोरांस लवकरात लवकर पकडून सदर गुन्हे उघडकीस आणण्याचे काम पोलीस पथकासमोर होते वालीव पोलीस ठाणे यांनी गुन्हयातील आरोपी व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेत असतांना आरोपी १) मेहताब मोहम्मद वजीर आलम वय २१ वर्षे रा. वाकणपाडा, नालासोपारा पुर्व २) राजु बुधराम गुप्ता वय २३ वर्षे रा. वाकणपाडा, नालासोपारा पुर्व ३) रजत बुधराम गुप्ता रा. वाकणपाडा, नालासोपारा पुर्व, ४) संतोष कांती शिंदे वय २१ वर्षे रा. नायगाव पुर्व यांना चौकशी करीत ताब्यात घेण्यात आले व त्यांना विश्वासात घेऊन त्यांचेकडे कौशल्याने तपास केला असता एकुण ७ गुन्हे केल्याचे त्यांनी वालीव पोलीस पथकासमोर कबूल केले . नमुद अटक आरोपी यांच्याकडून कडुन एकुण ८ मोटार सायकल, १ टेम्पो असा एकुण ६,१५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरील उल्लेखनिय कामगिरी श्री. संजयकुमार पाटील, पो.उप.आयुक्त, परि-२ वसई, श्री. अमोल मांडवे, सहा.पो.आयुक्त, तुळींज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाणेचे वपोनी श्री. कैलास बर्वे, पोनि. श्री. राहुलकुमार पाटील, गुन्हे प्रकटिकरण शाखेचे, सपोनि/ज्ञानेश फडतरे, पो.अंम. मुकेश पवार, योगेश देशमुख, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, अनिल सोनवणे, राजेंद्र फड, सतिष गांगुर्डे, पो.अंम. विनेश कोकणी, सचिन बलीद, बालाजी गायकवाड, यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली आहे.
