दिनांक 18/08/2021 रोजी 2.00 वाजण्याच्या सुमारास जुई नगर रेल्वे स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक भिंगार दिवे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील स्टाफ पोलिस ठाणे हद्दीत गस्त करत असताना सानपाडा बाजूकडून रेल्वे पटरी तून दोन इसम स्टेशन कडे पळत येत असताना चोर चोर असा आवाज आला असता नमुद स्टाफ त्या पळणाऱ्या संशयित इसमास रंगेहाथ ताब्यात घेतले असता दुसऱ्या प्रवासाने सांगितले की त्याने त्यांचा रेल्वे पटरीत ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन व पाकीट चोरले आहे तेव्हा त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव फिरोज सलीम खान वय 18 वर्ष राहणार वाशी रेल्वे स्टेशन बुकिंग समोर वाशी नवी मुंबई असे सांगितले असून त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दहा हजार रुपये किमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल फोन व पाकीट त्यामध्ये 110 रुपये रोख रक्कम असे जुईनगर रेल्वे स्टेशन जवळील पटरी चोरी केल्याचे सांगितले असून त्याबाबत वाशी रेल्वे पोलीस ठाणे येथे . गुन्हा दाखल करून नमूद आरोपीस सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी ही वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार तसेच मार्गदर्शनाखाली सपोनि लाड, पोलीस उपनिरीक्षक भिंगार दिवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नलावडे, खोतकर, पोकॉ .दराडे, मैंदाड यांनी केलेली आहे.
