विरार पोलीस ठाणे हद्दीतील रात्रौ वाहन चोरी करणारा आरोपी यांचा कौशल्याने तपास करुन आरोपी अबरार पैâमुद्दीन सैफी वय २४ वर्षे रा.ठि. चिंचोटी, दर्गाचे जवळ, यादवचा रुम पाच नंबर पाटीलपाडा, नायगाव पुर्व ता.वसई जि.पालघर यास वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांचे पथकाने सापळा रचुन त्यास ताब्यात घेऊन दिनांक १२.०८.२०२० रोजी १९.०९ वाजता अटक करुन त्यांस विश्वासात घेऊन कौशल्याने तपास केला असता त्यांनी वालीव पोलीस ठाण्याचे खालील गुन्हयातील आरोपी कडुन ७५,०००/- रुपये किंमतीचा मोटार सायकल हस्तगत करुन खालील गुन्हे उघडकिस आले आहेत.
वरील सर्व गुन्हयांची उकल वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विलास चौगुले यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि/ज्ञानेश्वर फडतरे, पोहवा/ मुकेश पवार, पोना/सचिन दोरकर, राजेंद्र फड, अनिल सोनवणे, सतिष गांगुडे पोशि/ विनेश कोकणी, स्वप्नील तोत्रे, सचिन बळीद यांनी केलेली आहे.
