वालीव : वालीव पोलीसांना खात्रीशीर बातमी मिळाली होती कि दिनांक २५.०८.२०२१ रोजी रात्रीच्या सुमारास तीन इसम गुजरात बाजुकडुन कोल्ही चिचोंटी येथे अहमदाबाद मुंबई हायवे रोडवरील पेट्रोल पंपाजवळ चरस या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरीता येणार आहेत. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने व वरिष्ठांचे मार्गदर्शनाने मुंबई – अहमदाबाद रोडवरील चिंचोटी ब्रीजचे पुढे असलेल्या पेट्रोल पंपाजवळ पो.निरी. मिलींद साबळे, सपोनि एस. एन. सांगवीकर, पोउनि सी आर पाटील, पोउनि एल बी बोरा, पोहवा सुशिल वाघ, पो.ना. योगेश घुगे, पोना महेश बोडके, पोना शिवाजी पालवे, पोशि महेश चौगुले अशा पथकाने सापळा रचून टोयाटो इन्होव्हा या गाडीतून आलेल्या ०३ इसमांना ८ किलो ९७८ ग्रॅम वजनाचा एकुण २६,९३,४००/- रुपये किंमतीचा प्रतिबंधीत चरस हा अंमली पदार्था सह पकडले. सदर घटनेच्या अनुषंगाने वालीव पोलीस ठाणे येथे दिनांक २६.०८.२०२१ रोजी गुन्हा रोजी दाखल करण्यात आला.सदर गुन्हयात एकुण ०३ आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यांना मा. न्यायालयाने दिनांक ०२.०९.२०२१ रोजी पोलीस कोठडी दिली असुन गुन्हयाचा अधिक तपास सपोनि एस एन सांगवीकर हे करीत आहेत.
वरील कामगिरी श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-२ वसई, श्री. अमोल मांडवे, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळीज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री कैलास बर्वे, पोनि. मिलींद साबळे, सपोनि एस एन सांगवीकर, पोउनि सी आर पाटील, पोउनि एल बी बोरा, पोहवा सुशिल वाघ पो.ना. योगेश घुगे, पोना महेश बोडके, पोना शिवाजी पालवे, पोशि महेश चौगुले यांनी केली आहे.
