वालीव : घरफोडी व चोरीचे वाढते प्रमाण बघून त्यास आळा बसावा म्हणून वालीव पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी व चोरी करणारे आरोपी यांचा घटनास्थळा वरुन मिळालेल्या तांत्रिक गोष्टींचा अभ्यास करुन तसेच गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधारे गुन्हयांचा तपास करुन गुन्हयातील रेकॉर्डवरील तसेच इतर धागेदोरे जमाकरून आरोपी १) महेंद्र उर्फ काल्या भवन निसाद वय : १९ रा. चिंचोटी, वसई २) राजनारायण छोटेलाल त्रिपाठी उर्फ लंगडा राजु वय : ३५ रा. गौराईपाडा, वसई ३) अतुल सिध्देश व्दिवेदी वय:२८ रा. चिंचोटी, वसई ४) मनिषकुमार शामलाल शर्मा वय :३० रा. चिंचोटी, वसई ५) अमोल शाम मंजुळकर वय २१ वर्षे रा. पेल्हार,नालासोपारा पुर्व यांना दिनांक १८.८.२०२१ रोजी रात्री ८:३५ वाजता अटक करुन गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी यांच्याकडे कौशल्याने तपास केला असता त्यांनी वालीव पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील गुन्हे केल्याचे कबुली दिल्याने गुन्हयातील चोरीस गेलेले मोबाईल, चांदीचे दागिने, रोख रक्कम, एलसिडी व अॅल्युमिनियम प्लेट असा एकुण- एकुण ७ लाख ९ हजार ९००/- किंमतीचा माल हस्तगत करुन एकुण १० गुन्हे उघडकिस करण्यात यश आले.
सदरची कामगिरी श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त, परीमंडळ-२ वसई, श्री. अमोल मांडवे, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळीज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कैलास बर्वे, पोनि/ श्री.राहुलकुमार पाटील (गुन्हे), व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि. ज्ञानेश फडतरे, पो.हवा. मनोज मोरे, मुकेश पवार, योगेश देशमुख, पो.ना. सचिन दोरकर, किरण म्हात्रे, अनिल सोनवणे, राजेंद्र फड, पोशि. विनेश कोकणी, सचिन बळीद, गजानन गरिबे यांनी केलेली आहे.
