वालिव गुन्हे प्रकटीकरण शाखेस मोठे यश घरफोडी करणाऱ्या आरोपीना गुजरात मधून अटक करून ८,७६,५१७/- रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला.

Crime News

दिनांक : १८.०६.२०२१ रोजी ५. ०० वा . ते दिनांक १.०७. २०२१ रोजीचे १०.१५ वाजताच्या दरम्यान श्री. प्रवीण कुमार माली यांच्या गाळा नं ३४७९/१२, नारायण डेव्हलपर्स , वसई फाटा , नालासोपारा पूर्व येथील कंपनीचा मागील शटरचा टाळा कुणीतरी अज्ञात चोरट्याने कुठल्यातरी टणक हत्याराने तोडून त्यावाटे कंपनीत प्रवेश करून स्टेनलेस स्टीलची साखळी व वाटी असा तयार करून डिलेवरीकरिता पॅकिंग करून ठेवलेला माल चोरी करून नेला अशी तक्रार  प्रवीणकुमार माली यांनी वालीव पोलीस ठाणे येथे केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

सदर गुन्ह्याचे घटनास्थळी पाहणी करून ,तांत्रिक गोष्टीचा वापर व गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर गुन्ह्याचा तपास करून सदर गुन्ह्यातील दोन आरोपी तसेच चोरीस गेलेला माल घेणारा आरोपी अशांना  अहमदाबाद , गुजरात राज्य येथून  आरोपी १)नयनारं नयनाराम पुरोहितवय २६ रा. . ओढव ,गुजरात २) रमेश करसन भिल वय : २७ रा. वालीव वसई ३ ) अनदाराम उर्फ अनिद रबारी वय : २५ रा. वालिव वसई यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनाचा चालक आरोपी क्र ४) नयिम अस्लम खान वय : २६ रा. नालासोपारा यास देखील वसई येथून ताब्यात घेण्यात आले असून सदर आरोपी यांना अटक करून गुन्ह्यातील एकूण ८,७६,५१७/- रुपये किमतीचा माल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी श्री. संजय कुमार पाटील, पोलीस उपआयुक्त , परिमंडळ -२ वसई , श्री. अमोल मांडवे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वळीव पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विलास चौगुले , पोनि. श्री. राहुलकुमार पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि . ज्ञानेश फडतरे , पोहवा. मुकेश पवार,मनोज मोरे , योगेश देशमुख , पो. ना . किरण म्हात्रे , सचिन दोरकर, अनिल सोनवणे , राजेंद्र फड , सतिष गांगुर्डे , पो. अंम. विनेश कोकणी, बालाजी गायकवाड , सचिन  बलीद , गजानन गरीबे , यांनी केलेली आहे.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply