वाडा तालुक्यात खैर तस्करांचा धुमाकूळ !

Crime News

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका हा दर्‍या, खोरी, डोंगराळ भागात, घनदाट जंगलात वसलेल्या लोकवस्तीच्या लोकांचा भाग आहे, अशा जंगलात मौल्यवान जातीचे वृक्ष आहेत, मौल्यवान साग प्रजातींचा झाडांची अज्ञात व्यक्तिन कडुन स्वतःच्या फायद्यासाठी रात्रीच्या वेळी तोड करून व रात्री अंधाराचा फायदा घेत वाहतूक केली जात असते.

वनविभागाचे अधिकारी – कर्मचारी दिवसा – रात्री फिरती गस्तीवर असताना सुध्दा, स्थानिक जनता बघून न बघितल्या सारखे करीत असल्यामुळे, किंवा जंगलतोड करणाऱ्याची दहशत असल्याने जंगलातील मौल्यवान वृक्षांची कत्तल होत असून त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम दिसत आहे.

दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्रीच्या वेळी सर्व सामान्य जनता साखर झोपेत असताना वनरक्षक रात्रीच्या वेळी मौजे – अंबरभुई – नांदणी – निंबवळी – गायगोठा भागात गस्त घालीत असताना अज्ञात व्यक्ती कडुन माहिती मिळाली असताना, वनरक्षक व त्यांचे सहकारी यांनी अकलोली गावाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांवर लक्ष केंद्रात केले असताना,गायगोठा फाट्यावरून संशयास्पद रित्या चाललेल्या क्वालीस गाडीला थांबण्याचा इशारा करून सुध्दा न थांबल्याने, आठ ते दहा किलोमीटर पाठलाग करीत असताना संशयास्पद गाडीचा टायर मौजे अकलोली जवळ फुटल्याने गाडी थांबवून, गाडी चालक व त्याचे साथीदार गाडी टाकून, अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

सदर वाहनाची ( क्वालीस गाडी एम, एच, – ०४ बी, डब्ल्यू ३१६७ ) पाहणी केली असता गाडीमध्ये विनापरवाना खैर प्रजातीची ०९ ओंडके आढळून आली.
सदर गाडी व त्यात असलेला मुद्देमाल जप्त करून आणला असता खैर प्रजातीचे ओंडके, त्यांचे शेत्रफळ अंदाजे १,०५९ चौरस घनमीटर आढळून येत आहे. भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१, ( २ ) ( ब ), २६, ४२, ५२, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त केलेले वाहन व त्यात असलेला मुद्देमाल यांची किंमत अंदाजे २,०००००/- इतकी असल्याचे वनविभाग अधिकारी यांचे सांगणे आहे.

सदर कारवाई वनरक्षक श्री, एस, एम, निकम. – निंबवली, श्री, व्हि, एन, वारगुंडे – अंबरभुई दक्षिण, श्री, ए, ए, नफाद – नांदणी व त्यांचे सहकारी यांनी श्री एच, व्ही, सापळे वन परिक्षेत्र अधिकारी वाडा ( पश्चिम ) मार्गदर्शनाखाली खाली केली असून पुढील तपास वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
याच प्रकारची कारवाई दिनांक ०९फेब्रुवारी २०२१ रोजी श्री सापळे साहेब यांच्या मार्गदर्शन खाली केली असून खैर प्रजातीचे ओंडके व वाहन अंदाजे किंमत २,७५००० /- किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.अशी माहिती हिरालाल लोखंडे यांनी दिली.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply