दिनांक २५/०८/२०२ रोजी ०१.४५ वाजताच्या सुमारास वसई पोलीस ठाणे हद्दीतील वसई कोर्टाच्या पाठीमागे साईबाबा गणपती मंदीराच्या बाजुला टेम्पररी शेडमध्ये काही इसम जुगार खेळत असल्याची गुप्त माहीती मिळाली होती. मिळालेल्या माहीतीच्या आधारे सदरठिकाणी छापा टाकला असता आरोपी १) सिध्देश सुभाष टूमकर वय ३७ वर्ष २) दयानंद सुधाकर पाटील वय ३३ वर्ष ३) दिपेश सुधाकर मोरे वय ३० वर्ष ४) काशीनाथ रत्नाकर चौहान वय ४५ वर्ष ५) दिपेश अरुण ठाकरे वय ४२ वर्ष ६) महादेव रत्नाकर चौहान वय ४३ वर्ष ७) आकाश संजय जाधव वय २३ वर्ष ८) कल्पेश सुधीर राउत वय ४० वर्ष ९) भावेष पुर्ण नाव गाव पत्ता माहीत नाही यांनी वसई कोर्टाच्या पाठीमागे साईबाबा गणपती मंदीराच्या बाजुला टेम्पररी शेडमध्ये जुगार खेळत असतांना मिळुन आले. आरोपी यांचे ताब्यातुन १३,७२०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी यांच्या विरुध्द वसई पोलीस ठाणे गु.र.जि.नं.३१०/२०२० मुंबई जुगार कायदा १२ (अ) भा.दं.वि.सं.कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन ५१ (बी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालु आहे.
सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक श्री.अनंत पराड, प्रभारी अधिकारी, वसई पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली वसई पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.
