मिरारोड : वाहतूक पोलीसांनी गाडी नो पार्किंग जागेत गाडी पार्क करणाऱ्यावर कारवाई करत असतांना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या दांपत्यावर वाहतूक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काशिमीरा वाहतूक पोलीस कृष्णत दबडे , मीरारोड येथे नो पार्किंग मध्ये गाडया पार्क करणाऱ्यांवर कारवाई करत होते त्या वेळी मीरा रोड येथे कार अँसेसरीज ऑटोमोबाईल्स दुकानासमोर अरुण सिंग यांनी आपली चारचाकी गाडी नोपार्किंग बोर्डजवळ उभी केली होती. दबडे यांनी क्रेन लावून आजूबाजूस विचारणा केली, पण गाडीचे चालक दिसले नाही म्हणून दबडे यांनी गाडी ला जॅमर लावले त्याच वेळी सिंह दांपत्य तिथे आले व दबडे यांना शिविगाळ व दमदाटी करू लागले त्यांच्या या वागणुकीस बघता पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
सदर प्रकरणी वाहतूक पोलीस दबडे यांनी अरुण सिंह व मिना सिंग या दांपत्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सिंह यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले असता झालेल्या प्रकाराबद्दल सिंग चक्क माफी मागू लागले . घडलेल्या घटनेची चौकशी पोलीस करीत आहेत. पोलिसांनी सिंग यांना अटक करून शुक्रवारी न्यालयात हजर केले असता न्यालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
