वडाळा : वडाळा रेल्वे पोलिस स्टेशन हद्दीत दिनांक ०९/०९/२०२१ रोजी रात्री ११. ०० वाजता महिला प्रवाशी ह्या किंग्ज सर्कल रेल्वे स्थानक येथे लोकल गाडीची वाट पहात स्टेशन बाकड्यावर बसून मोबाइल फोन मध्ये व्यस्त असताना एका अनोळखी इसमाने त्यांच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने खेचून ट्रॅक मध्ये उडी मारून पळून गेला अशी तक्रार केली असता सदर अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपसात सीसीटव्ही फुटेज व गुप्त बातमिदाराच्या मदतीने यातील नमूद आरोपी हा बंगालीपुरा, वडाळा या परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने तपासपथकाने योग्य त्या रीतीने सापळा रचून आरोपी मोहम्मद मोसब्बर बोगदर शेख. वय २० वर्षे राह वडाळा, यांस ताब्यात घेतले त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून १८,४९९/- रू किमतीचा एक रेड मी कंपनीचा मोबाईल फोन फोन मिळून आला. सदरचा गुन्हा हा वर नमूद आरोपीने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला त्यास त्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी तपास पथकाचे सपोनि श्री चव्हाण, पोहवा ऐवळे, पोना वर्पे, शेख, पोशि जगदाळे, सानप, कांबळे, रणनवरे. यांनी पार पाडली.
