दादर : दि.१७/१०/२०२१ रोजी पोलीस हवालदार शिंदे, पोलीस शिपाई आरकड हे ड्युटी वर असताना सुमारे ०१. १५ वा. प्रवासी वसंत यल्लापा खोत वय 46 वर्षे राह- कल्याण पूर्व यांनी पोलीस ठाण्यात येऊन कळवले की ते सिध्देश्वर एक्सप्रेस मधून दादर ते कल्याण असा प्रवास करत असताना त्यांचा दादर ते माटुंगा दरम्यान 8,000 रू कि रेमोबाईल फोन ट्रॅक मध्ये पडल्याचे सांगितले त्यावर अंमलदार र यांनी रात्री ट्रॅक मध्ये जाऊन मोबाईल फोन चा शोध घेऊन पोलीस ठाण्यात हजर असलेल्या प्रवासी यांना सदरचा मोबाईल दाखवून त्यांचाच असल्याची खात्री करून, त्यांच्या ताब्यात दिला . मोबाईल परत ताब्यात मिळाल्याने त्यांनी दादर रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहे.
चर्चगेट : दिनांक १६/१०/२०२१ रोजी पोना /३११९ खरतूडे हे चर्नी रोड रेल्वे स्थानक येथे सपोफौ खरात यांचेसह गस्त करीत असताना त्यांना एक आयफोन किंमत अंदाजे रुपये ५०,०००/- मिळून आल्याने त्यावरील संदेश मिळून आला त्यावर संपर्क साधला असता तो रेल्वे प्रवासीपंकज गोयल राहणार प्रभादेवी मुंबई यांचा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताबडतोब चर्चगेट रेल्वे पोलीस ठाणे येथे बोलावून त्यांचा आधार कार्ड व मोबाईलची मूळ पावती पडताळून पाहून तो त्यांच्या मालकीचा असल्याचे खात्री करून मोबाईल त्यांच्या ताब्यात दिला . सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. साळुके यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
बोरीवली : दिनांक१५/१०/२०२१रोजी मपोशि साळवी व मपोशि दराडे या राजपाळी लोकल पेट्रोलिंग ड्युटीस असताना त्यांना चर्चगेट लोकल मध्ये महिलांच्या डब्यात एक पर्स मिळून आली ती प्रेरणा योगेश चेऊलकर यांची राखाडी रंगाची शोल्डर पर्स त्या विसरून जोगेश्वरी येथे उतरल्या होत्या पर्स मध्ये एकून कॅश८,५२०/- रू.तसेच आधारकार्ड ,एटीएम कार्ड,पॅन कार्ड,नॅशनल पेन्शन सिस्टीम कार्ड,सेन्ट्रल रेल्वे पास, सेन्ट्रल रेल्वे आयकार्ड व गडद निळ्या रंगाचे पॉकेट असे सामान होते. सदर महिलेचा भाऊ भूषण तारे यांना महिला अंमलदारांनी संपर्क साधून सदर पर्स आतील रोख रुपये व कागदपत्रांसह त्यांच्या ताब्यात दिली .
डोंबिवली : माननीय रेल्वे आयुक्त साहेब यांच्या मुद्देमाल निर्गती विशेष मोहिमेअंतर्गत तसेच प्रभारी अधिकारी श्री मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनानुसार म पो.हवा धादवड यांनी अमोल शांताराम गुजराती वय ४० वर्षे राहणार पुणे यांचा चोरीस गेलेला २५०००/-किमतीचा Toshiba कंपनीचा लॅपटॉप व एक १००००/-किमतीचा मोबाईल फोन दिनांक १६/१०/२०२१ रोजी परत करण्यात आला आहे फिर्यादी यांनी त्यांचा मुद्देमाल परत मिळाल्याने डोंबिवली रेल्वे पोलिसांचे खूप आभार मानले आहेत.
कर्जत : दिनांक १६/१०/२०२१ उस्मान शेख राह अंबरनाथ हे सी एस एम टी ते खोपोली लोकल गाडीने प्रवास करीत असताना त्यांची सॅकबॅग गाडीमध्ये विसरले याबाबत त्यांनी रेल्वे हेल्पलाईन ला कळवले असता कर्जत रे. पो. ठाणेचे ठाणे अंमलदार पो ना शिंदे यांचे सुचने वरून पोना गांगुर्डे व पोशि म्हसणे यांनी गाडी वेळेत अटेंड करून वरील नमूद बॅग ताब्यात घेतली त्यांनी कॉलर यांना संपर्क करून कर्जत रेल्वे पोलिस ठाणे येथे बोलावून त्यांचे बागेतील पासपोर्ट मेडिकल ची कागदपत्रे परत केले नमूद प्रवासी यांनी कर्जत रेल्वे पोलिस आणि लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले आहेत.
पालघर : पो. ना.जाधव व मापोशि कडवं असे स्टेशनवर ड्युटी वर असताना बोईसर रेल्वे स्टेशन फलाटावर त्यांना १५,५००/- रू. किंमतीचा मोबाईल फोन मिळून आला. सदर मोबाईल फोन मधील नबर काढून संपर्क करून प्रिती हरी दुबळा, वय २७ वर्ष, राह. कापशी, वानगाव पूर्व,र यांना संपर्क करुन बोईसर रेल्वे पोलीस चौकीत बोलावून त्यांची चौकशी करून मोबाईल फोन त्यांना परत दिला.
कल्याण : प्रिती सुभाष यादव वय १९ वर्ष रा. मझिवडा ठाणे वेस्ट जिल्हा ठाणे यांची कल्याण रेल्वे स्टेशन याठिकाणी विसरलेली पर्स pc मांडवे ,wpc पाटील यांनी गस्त करीत असताना मिळाली ती पर्स चेक केली असता त्यामध्ये १०१४/- रुपये आणि आधार कार्ड हॉस्पिटल चे पेपर मिळून आले आधार कार्ड वरुन मोबाइल नंबर घेउन संपर्क करून प्रिती यादव यांना उल्हासनगर स्टेशन ला बोलावून सामना सह खात्री करून त्यांच्या ताब्यात दिले आहे.त्यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले.
