लाखो रुपयांच्या ऐवजांची घरफोडी करून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांस काशिमीरा पोलिसांनी केली अटक.

Crime News Latest News Political News Regional News

काशिमीरा : घरफोडी करणा-या सराईत आरोपीचा १० तासाच्या आत शोध घेवुन २३,१०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत – काशिमीरा पोलीस ठाणेची कामगिरी.

मिळालेल्या माहितीनुसार काशिमीरा, मिरारोड पुर्व, रा. रुम नं २०२, बि.नं ०६, डी.बी. ओझोन ठाकुर मॉलजवळ,येथे राहणारे अकबर अली मोहम्मदअली चुडीहार, हे दिनांक २३/०३/२०२३ रोजी ते दिनांक २६/०३/२०२३ रोजीसायंकाळ च्या दरम्यान रमजान उत्सवानिमित्त चंद्र दर्शनासाठी गोरेगाव, मुंबई येथे गेले असता आरोपी याने त्यांच्या  घराच्या खिडकीच्या ग्रीलचे दोन गज कापुन घरात प्रवेश करुन घरातील लाकडी तसेच लोखंडी कपाटातील ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले एकुण २९३ ग्रॅम वजनाचे १४,६५,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, एक किलो वजनाचे ७०,०००/- रुपये किंमतीचे चांदीचे दागिने व ०९,००,०००/- रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल  घरफोडी करून चोरी करून फरार झाला. अकबर अली यांनी याची तक्रार दिल्याने काशिमीरा पोलीस ठाण्यात  दिनांक २६/०३/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. संदीप कदम यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील स.पो.नि. श्री. प्रशांत गांगुर्डे यांना सदर गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. नमुद गुन्हयातील आरोपीच्या गुन्हे कार्यपध्दतीवरुन अश्याप्रकारचे गुन्हे करणारे ईसमांची माहिती घेतली असता गुप्तबातमीदारा मार्फत प्राप्त माहितीच्या अधारे आरोपी अब्दुल शेख ऊर्फ अब्दुल चिरा, वय ४६ वर्ष, रा. रुम नं २११, आदर्श निवास, अलकापुरी, आचोळा क्रॉसरोड, नालासोपारा, ता. वसई, जिल्हा – पालघर याने सदरचा गुन्हा केला असल्याचे व तो परराज्यात पळुन जाण्याच्या तयारी असल्याचे पोलिसांना समजल्याने स.पो.नि. प्रशांत गांगुर्डे व पथकाने नालासोपारा रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचुन वर नमुद आरोपीस ताब्यात घेतले. सदर आरोपीकडून गुन्हयातील चोरी केलेल्या रक्कमेपैकी ०७,७५,७००/- रोख रुपये हे जागीच हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच तपासादरम्यान चोरीस गेलेले २९३ ग्रॅम वजनाचे १४,६५,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व ८५० ग्रॅम वजनाचे ७०,०००/- रुपये किंमतीचे चांदीचे दागिने असा एकुण २३,१०,०००/- रुपये किंमतीचा मुदेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

त्याचप्रमाणे  वरील आरोपी हा अभिलेखावरील सराईत आरोपी असुन त्याच्या विरुध्द मुंबई, ठाणे, पालघर, अजमेर राज्य-राजस्थान या परिसरात घरफोडीचे ४० हुन अधिक गुन्हे दाखल आहेत. आरोपीने गुन्हा करतेवेळेस कोणताही तांत्रिक किंवा भौतीक पुरावा मागे न ठेवता गुन्हा केला होता पंरतु त्याचे गुन्हा करण्याचे कार्यप्रणालीचे अवलोकन व गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त माहितीचे आधारे काशिमीरा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यानी गुन्हा दाखल झाल्यापासुन अवघ्या १० तासात आरोपीस  जेरबंद केले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, श्री. श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त, श्री. जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०१, मिरारोड, श्री. विलास सानप, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संदीप कदम, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, काशिमीरा पोलीस ठाणे, पो.नि. श्री.विजय पवार (गुन्हे), स.पो.नि. प्रशांत गांगुर्डे, पो.उप.नि. जावेद मुल्ला, प्रकाश कावरे, सागर साबळे, म.पो.उ.नि.अर्चना जाधव, स.फौ. अनिल पवार, पो.हवा. सचिन हुले, निलेश शिंदे, सुधीर खोत, राहुल सोनकांबळे, संतोष तायडे, रविंद्र कांबळे, पो. अंम. शरद नलावडे, प्रविण टोबरे तसेच पो.हवा. जयप्रकाश जाधव नेम. पोलीस उप आयुक्त कार्यालय, परिमंडळ ९ यांनी केली आहे.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply