मिरा भाईंदर : काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत व इतर सर्व ठिकाणी चालु असलेल्या लग्नसराईमध्ये हॉलमधील लग्न समारंभातुन सोन्या- चांदीचे दागिने, मोबाईल फोन तसेच रोख रक्कम चोरी झाल्याबाबत गुन्हे दाखल झाले होते. नमुद गुन्हयातील आरोपीचा शोध काशिमीरा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे, अधिकारी व अंमलदार घेत होते. घटनास्थळावरुन मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे व गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे काशिमीरा पोलिसांनी १)बाबु लखपत सिसोदीया वय – २१ वर्षे,२) आतीश अमर सिसोदीया, वय -२३ वर्षे,३) निखील रवी सिसोदीया, वय – १९ वर्षे,४) विधीसंघर्षग्रस्त बालक व ५) करण महवीर सिंग, वय – २३ वर्षे, यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपी यांना दिनांक ०६/१२/२०२१ व दिनांक ०९/१२/२०२१ रोजी अटक करुन तसेच एका विधी संघर्षीत बालकास ताब्यात घेवून गुन्हे प्रकटीकरण शाखेने आरोपी यांच्याकडे तपास केला असता त्यांनी काशिमीरा, बांगुरनगर, सहार, इगतपुरी, ओशिवरा व सांताक्रुज पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील गुन्हे केल्याची कबुली दिली असुन नमुद आरोपीनं कडुन गुन्ह्यातील चोरीस गेलेले ३०० ग्रॅम वजनाचे सोन्या चांदीचे दागिने, अँपल , रेडमी, ओप्पो, विवो कंपनी चे ६मोबाईल फोन व ५०,०००/- रोख रक्कम व गुन्ह्यातील वापरलेले वाहन स्विफ्ट कार एकुण २१,०४,१६५/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन एकुण ०८ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणलेले आहेत.
सदरची कामगिरी श्री. अमित काळे, पोलीस उपआयुक्त परीमंडळ-०१, श्री. विलास सानप मा. सहाय्यक पोलीस आयुक्त मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली व.पो. नि. श्री संजय हजारे, स. पो. नि. श्री प्रशांत गांगुर्डे, पो. उप. निरी.जावेद मुल्ला, स. फौज.पी. जी. कावरे, पो.ना विश्वनाथ जरग, पो.शि. हनुमंत तेरवे, समीर यादव, सुधीर खोत, अनिल नागरे, पो.शि. सनी सुर्यंवशी यांनी केलेली आहे.
