लातूर : डॉक्टर हे आपल्या समाज्यातील एक अत्यन्त जबाबदार व्यक्तिमक्त आहे तरीही काही महाभाग याला काळीमा फासतात असेच काही घडले आहे लातूर जिल्ह्यात . लातूर जिल्ह्यातील साकोळ (ता.शिरूर , अनंतपाळ ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या डॉ . संदीप वसंतराव मंत्रे (रा. सोमश्वर नगर,परळी ) असे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे . डॉ. संदीप यांनी गेल्यावर्षी १८ सप्टेंबर रोजी मुलीच्या म्हणजेच फिर्यादीच्या वडिलांच्या घरी जाऊन मी सध्या वैद्यकीय अधिकारी आहे असे सांगून मला तुमच्या मुली बरोबर लग्न करायचे आहे असे सांगून तिला लग्नाची मागणी घातली . मुलीचे वडील यामुळे खुश झाले . पण संदीप ने सांगितले कि मला लातूर ला रुग्णालय सुरु करायचे आहे व त्यासाठी मला सात लाख रुपये द्यावे . अशी त्याने अट ठेवली. मुलगा डॉ .आहे व तो स्वतः मागणी घातली असल्याने आपल्या मुलीचे भविष्य चांगले होईल अशा आशेने मुलीच्या वडिलांनी संदीप सोबत लग्न जमवले . त्यानुसार २३ सप्टेंबर रोजी काही मोजक्याच नातेवाईकाच्या उपस्थितीत साखरपुडा करून घेतला. २१ ऑक्टोबर रोजी ठरल्याप्रमाणे मुलीच्या वडिलांनी सात लाख रुपये संदीपच्या घरी नेऊन त्यांच्या वडिलांकडे सुपूर्द केले आणि लग्न यावर्षी ५ मे रोजी ठरले . त्याप्रमाणे मुलीच्या वडिलांनी लग्नाची जोरदार तयारी सुरु केली . मात्र २३ मार्च पासून संदीप ने आपला मोबाइल बंद केला . अखेर ४ एप्रिल रोजी संदीप ने त्याचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न झाल्याचे व्हाट्सअप वर सांगून लग्नास नकार दिला .
या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी डॉ . संदीप विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद केला. संदीप ने हुंडा घेतलेल्या मुलीच्या कुटूंबियांना अंधारात ठेऊन दहा वर्षांपासून ओळख असलेल्या मुलीसोबत लातूर जिल्यातीलरायवाडी येथील मंदिरात लग्न केले त्याच मुलीसोबत लग्न करण्याचे निश्चित असताना हि संदीप ने माझ्या मुलीसोबत विवाह करतो म्हणून सात लाख रुपये घेऊन फसवणूक केले असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे .
