लग्नाचे दागिने व कपड्यांच्या बॅगांचा शोध लावण्यामध्ये नवघर पोलीसांना मिळाले यश

Crime News

 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाईंदर येथे राहणारे रहिवाशी श्री. तुकाराम परशुराम कदम हे त्यांच्या मुलीचे इंद्रवरून सभागृह, भाईंदर (पूर्व) येथे लग्न समारंभासाठी त्यांच्या पत्नी सोबत कपडे व सोन्याचे दागिने ठेवलेली बॅग घेऊन ऑटो रिक्षाने घरी जात होते. त्या वेळी रिक्षा मधून उतरताना कपडे व सोन्याचे दागिने ठेवलेली बॅग तुकाराम कदम यांची पत्नी रिक्षामध्ये विसरल्या. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तुकाराम कदम यांनी नवघर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. सदरची घटना दिनांक. ११/१२/२०२० रोजी घडली.

तक्रार दाखल होताच नवघर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे, पोलीस ना./१४१८ भालेराव व पथक यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन बारकाईने तांत्रिक तपास करून ऑटो रिक्षा क्रमांक एम. एच. ०४-जे. क्यू-६८९६ ही रिक्षा असल्याचे निष्पन्न झाले. रिक्षा चा शोध घेऊन रिक्षा मालक यांने सदरची ऑटोरिक्षा मोहम्मद मुस्तफा मकसूद अली याला भाड्याने चालविण्यास दिली असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून रिक्षाचालक मोहम्मद मकसूद अली चा शोध घेण्यात आला तेव्हा तो त्याच्या मूळगावी उत्तर प्रदेश येथे जाऊन दिनांक. ११/०१/२०२१ रोजी उत्तर प्रदेश येथून काशिमीरा येथे परत आल्याची माहिती मिळताच त्याला विश्वासात घेऊन तुकाराम कदम यांच्या पत्नीने रिक्षात विसरलेल्या बॅगे बाबत चौकशी केली.

तेव्हा आरोपी मोहम्मद मकसूदअली‌ याने कपडे आणि ५३.५७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत अंदाजे २,५०,०००/- रुपये असलेली बॅग अप्रामाणिकपणे स्वतःकडे ठेवून स्वतःच्या मूळ गावी नेऊन ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून आरोपी मोहम्मद मकसूदअली विरुद्ध अदलखपात्र गुन्हा क्र. ०१७९/२०२१ भादवि कलम ४०३ अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला. कपडे व ५३.५७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आरोपीकडून जप्त करून नवघर पोलीसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

सदरची कामगिरी श्री. अमित काळे पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ शशिकांत भोसले, सहाय्यक पोलीस आयुक्त, नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. संपतराव पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे आणि पथक यांनी केली.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 4 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply