कुर्ला : १) लोकमान्य टिळक टर्मिनस येथे एक प्रवासी गाडीची वाट पाहत झोपले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाकीट चोरले अशी तक्रार कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली त्यावरून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून आरोपीचा फुटेजच्या मदतीने व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे यातील आरोपींचा कसून व कौशल्यपुर्ण शोध घेतला असता राजकुमार द्वारका पटेल, वय १९ असणारा दुसरा आरोपी सविलास शिवाजीराव महाकुंडे ऊर्फ जाड्या, वय ३९वर्षे, राह. सानपाडा, याचा कौशल्यपुर्ण तपास करून त्यास ताब्यात घेवून नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. तसेच आरोपींकडून केलेल्या कौशल्यपूर्ण तपासकरून एकूण ६०,८००/रु की. चे ०४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.सदरची कामगिरी व.पो.नि. यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.निरी / दुम्मलवाड यांचे पथकातील स.पो.फौ. कवटेकर, पो.हवा./शेडगे, लांडगे, पो.ना./गोडे, लवटे, पाटील, पो.शि./भराडे, कांगणे असे पथकाने केलेली आहे.२) दि.२८/१०/२०२१ रोजी छपरा एक्सप्रेसच्या डब्याच्या दरवाज्यात उभे राहून मोबाईल हातात धरून प्रवास करीत असताना, आरोपी नौशाद हारूण हाशमी, वय २३ वर्षे, राह. बांद्रा (पु.), याने प्रवासी यांच्या हातातील ८,५००/- रू. किंमतीचा मोबाईल फोन खेचून चोरून पळून जाताना आरपीएफ व पोलीसांनी रंगेहाथ पकडले असून त्यास नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. सदरची रची कामगिरी व.पो.नि. यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.निरी / दुम्मलवाड यांचे पथकातील पो.हवा./शेडगे, लांडगे, पो.ना./गोडे, लवटे, पो.शि./भराडे, कांगणे असे पथकाने केलेली आहे.
बोरीवली : रेल्वेमध्ये महिलेची छेडछाड करणारे 1) बहादुर सिंग रघुजी वाघेला वय २७ , राह – भुलेश्वर मुंबई, 2) आनंद भाई भरतभाई सोनी , वय -३०, भुलेश्वर 3) नटवजी बाबूजी राजपूत , वय-५५, बिल्डिंग न-१३ भुलेश्वर मुंबई ,यांना दिनांक ३०/१०/२०२१ रोजी बोरीवली रेल्वे पोलीस यांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी- वपोनि श्री.अनिल कदम, सपोनि दर्शन पाटील, पो उपनि मुलगीर , पो उपनि कांबळे , शेख, पोना/600 शिंगाडे , पवार ,पो शि पाटील, सकट, चौधरी स्टाफ, बोरीवली रेल्वे पोलिस ठाणे, लोहमार्ग मुंबई
